shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षकांनी पवित्र ज्ञानदानाचे काम करावे, राजकीय बाहुले बनू नये - दत्ता कडू पाटील..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर 

शिक्षकांनी पवित्र ज्ञानदानाचे काम करावे, राजकीय बाहुले बनू नये - दत्ता कडू पाटील..!!

देवळाली प्रवरा : शिक्षकांनी पवित्र ज्ञानदानाचे काम करावे, राजकीय बाहुले बनू नये असे माजी सनदी अधीकारी दत्ता कडू पाटील यांनी त्यांच्या गावगाडा म्हंटले आहे.   

       फेसबुक पेजवर पुढे लिहताना कडू पाटील म्हणतात आज गांवगाडा लवकर लिहतो आहे. खरंतर तो आज दुपारी लिहावा अशी मनस्थिती बनली होती. एव्हाना घटना तुमचे लक्षात आलीच असेल. आप्पासाहेंब ढुस न् हेल्फ टीमच्या सर्व सदस्यांनी आज हायस्कूल शाळेत गुपचुप पालक शिक्षक संघ तसेच शाळा व्यवस्थापन समीती स्थापन करण्याचा प्रयत्न उधळुन लावला. खरंतर रात्री आमचे हेल्फटीमच्या कोअर कमेटीच्या ग्रुपवर अमजदभाईंनी आजच्या पालक शिक्षक सभेबाबत विचारणा केली होती. मी ती नोटीस वाचुन शाळेची वेळ वाढविणेबाबत विषय दिसतो. पालक शिक्षक संघ आणखी स्थापन झाला नाही. माझे या उत्तरावर अमजदभाई म्हणाले कधी होणार स्थापन , त्यावर सागरने आप्पासाहेंबाना उपोषण पाठीमागे घेताना शाळेने दिलेल्या पत्रातील शब्द लिहला. यथावकाश... त्यावर स्माईली झाल्या. परंतु पुढे शरमेने मान खाली घालावी असा प्रकार घडला. तो पाहुन देवळालीकरांनो आमची आम्हांला लाज वाटायला लागली. विद्यार्थ्यांच्या भवीतव्याशी निगडित हा विषय राजकारण्यांसाठी राजकिय अड्डा बनावा या इतकी घाणेरडी गोष्ट कोणती नाही. त्यात शिक्षकहि सामील व्हावेत याचे इतके दुर्दैव्य कोणते नाही. ज्ञानदानाचे पवीत्र काम सोडुन हे राजकारण्यांचे बाहुले बनले आहेत. 
          तुम्ही काय म्हणाल काय आहे त्या पालकशिक्षक संघात. काय तुम्ही हा प्रश्न एवढा प्रतिष्ठेचा करता. तुमचे बालबच्चे शिकावेत. त्यांना चांगले शिक्षण मिळावे. तेथे कमी फी असावी. अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही वेगळे विषय त्यांचे व्यक्तीमत्वांस पोषक होतील राबवावे. तेथील शैक्षणीक वातावरण निकोप राहिल असा नैतीक धाक मुलांवर रहावा. हे सगळे व्हावे असे तुम्हां पालकांना वाटते ना. मग तोच पालकशिक्षक संघ ज्याचे पोरं त्या शाळेत नाहीत. ज्यांची पोरं मोठमोठ्या इंग्रजी शाळेत तगडी फी भरुन शिकली. त्यांचा न् तुमच्या मुलांचे कल्याणांचा काही संबंध नाही केवळ आपल्या बगलबच्च्यांना तेथे राजकिय पुर्नवसन करत बसवायचे. विरोधकांचे मुलांना कमी मार्क देत त्यांचे खच्चीकरण करायचे. शिक्षक शिक्षकेला दबावाखाली ठेवायचे कॅापी करु दिली नाही म्हणुन शाळेचा निकाल कमी लागल्याने त्या भरारी पथकांचे लोकांना दम देणारे महाभाग. अन् मग लहानपणापासुन हेच चेहरे डोळ्यांसमोर राहिल्यांने आपले शिक्षकच यांना घाबरतात मग आयुष्यभर तुमची पोरं यांना घाबरत रहाणार. मग सांगा देवळालीकरांनो हा पालकशिक्षक संघ किती महत्वाचा आहे.तुम्ही जर तुमच्या मुलांचे भवितव्य यांचे हवाली करत हि जहागिरी त्यांना बहाल करत असाल तर आम्ही आमचा बिनकामांचा बोंबलायचा धंदा बंद करतो. 
        नोटीस काढताना विषय एक. परंतु प्रत्यक्षात तिथे वाचन सुरु केले पालक शिक्षक संघाचे स्थापनेच्या शासन निर्णयाचे. को-या कागदावर पालकांचे सह्या घेत हवी तशी नेमणुक करुन घ्यायची. काय म्हणावे याला. कश्यासाठी सगळा हा खटाटोप. तोहि मांडु वेळ आल्यावर तुमच्यासमोर. हेल्फटीमच्या चाणाक्ष सदस्यांचे नोटीशीमधील भाषा लक्षात आली होती. तेंव्हा आप्पासाहेंबांचे नेतृत्वाखाली हेल्फटीम तिथे हजर होतीच. त्यांनी हा सगळा प्रकार कसा उधळुन लावला हे तुम्ही पाहिले असेल. आता आम्ही समाजकंटक वा विध्नसंतोषी , कोल्हेकुई म्हणुन हेटाळणी करणार. पण देवळालीकरांनो उघडा डोळे बघा नीट.  
         शाळेतील गोंधळ कानी येताच मी प्राचार्यांना अगदी चांगल्या भाषेत समजावले आपल्याकडुन हि अपेक्षा नसल्याचे बजावले. सगळ्या पालकांना उंघडपणे बैठकीचा अजंडा देत का बैठकीचे निमंत्रण दिले नाही. तुम्ही अध्यक्ष झालात ना हेल्फटीमच्या पाठपुराव्यामुळे . मग नियमाने काम करा. उगाच कुणाचे दबावाला बळी पडु नका. मी जिल्हा शिक्षणाधिकारी श्री कडुस यांना फोन करुन सगळी वस्तुस्थिती सांगितली. आम्हांला तिकडे जाण्याची हौस नाही. आमची पोरं नाहीत तिथे आता. आमची मुले जेव्हा बाहेर पडली शाळेतून आम्ही त्याक्षणांपासुन पालकशिक्षक संघ सोडला न् शाळेत पाऊल ठेवले नाही. कुणालाहि करा पण नियमाने करा. हि कुटनिती न् कृष्णनिती जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यत चालु देणार नाहीत. पण देवळालीकरांनो तुमचे काय. हे तुमच्या पोरांबाळांसाठीच आहे. पहा तुम्हांला पटते का आम्ही काय म्हणतो ते. शुभसंध्या #गांवगाडा

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close