shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोगस शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षण संघ स्थापनेचा डाव आप्पासाहेब ढुस यांनी उधळला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर 

बोगस शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षण संघ स्थापनेचा डाव आप्पासाहेब ढुस यांनी उधळला..!!

देवळाली प्रवरा : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालायात  शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करताना पालकांना विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे. नाहीतर येरे माझ्या मागल्या अशी स्थिती व्हायला नको म्हणून या शाळेची पालक  संस्था असलेल्या जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाकडे आणि राज्याच्या शिक्षण सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व देवळाली प्रवरा हेल्प टिमचे सदस्य आप्पासाहेब ढुस यांनी प्रतिपादन  केली आहे.  
 
     देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालायात पालकांना फसवून सह्या घेऊन बोगस शिक्षण व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा शिक्षकांचा डाव  आप्पासाहेब ढुस यांच्या सतर्कतेमुळे आज उधळला. 

     देवळाली प्रवरा येथील या शाळेचा वेळ वाढवून घेणेसाठी मुलांकरवी संदेश पाठवून शाळेने आज पालकांची बैठक बोलावली होती, मात्र त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेने, अजेंडा न देताच समिती स्थापन करता येणार नाही असा आक्षेप ढुस यांनी घेतल्याने पालकांची शाळेने फसवणूक केली असल्याचे लक्षात आलेने पालक या सभेतून बाहेर पडले.  

      या प्रसंगी बोलताना ढुस यांनी सांगितले की , शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक शिक्षक संघ स्थापन करताना सर्व पालकांना अजेंडा देऊन सात दिवस अगोदर कळवावे लागेल त्या शिवाय अशी वेगळ्या कारणासाठी सभा बोलावून पालकांची शाळेने  फसवणूक केली आहे व समिती गठीत करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी समिती शाळेने गठीत करू नये.
      या ठिकाणी शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे, स्थानिक राजकारण करू नये असे ढुस यांनी सांगून आम्ही  अश्या शिक्षकांची जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था, जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शक्षण सचिवांकडे या बोगस समिती स्थापणेच्या कुटील डावाबद्दल तक्रार करणार असल्याचे ढुस यांनी सांगितले.
      या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला व पुरुष पालक यांचेसह देवळाली हेल्प टीमचे सदस्य हजर होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close