प्रतिनिधी : आसावरी वायकर
दहिगाव : २५ / नगर तालुक्यातील दहिगाव येथे खुप आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जतन करणं काळाजी गरज आहे. आज जेष्ठ नागरिक, वयोवृध्द यांची सामुदायिक पाद्यपूजा व विधवा महिलांचा सन्मान साडी चोळी देऊन करण्यात आला. आसपासच्या गावातील जेष्ठ नागरिकांचा सपत्नीक नवीन पोशाख व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिकांच्या जोडीला शेजारी बसुन जोडीचे औक्षण करण्यात आले. तसेच पुष्पवृष्टीही करण्यात आली.
हा जेष्ठ कौतुक सोहळा संपन्न होत असताना काही जेष्ठ मंडळींच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसतं होते.
"जन्मा बरोबर असलेला
मृत्यू मला ठाउक आहे
उत्साहाने बाहेर भटकेन
जरी तो माझ्या मागे आहे "
याच भावना जेष्ठ नागरिकांच्या डोळ्यात दिसून येत होत्या.
कारणही तसंच आहे. या जागतिक महामारी म्हणजे कोरोना रोगापासून आज पर्यंत सुखरूप जीवन प्रवास इथपर्यंत आला आहे. आपल्या डोळ्यासमोर आपलं कौतुक पाहुन अनेक नागरिक भारावले होते. हिंदू संस्कृती मध्ये अंत्यविधीस नवीन पोशाख फुले हार हे करतात ,पण तो नवीन कपडे हार फुल शेवटच्या क्षणी असतात .आज आम्ही या गोष्टीचाआनंद घेत आहोत . हा आजचा सन्मान सोहळ्यानी जेष्ठ नागरिक भारावून गेले होते.
तो सपत्नीक सत्कार म्हणजे
"विसरेन जन्म तारीख
म्हातारपणाला थारा नको
किती मी चंद्र पाहिले
त्याचा हिशोब ठेवायला नको "
असाच होता असे सांगत जोडीनं हा एक आनंदाचा क्षण आम्हाला भेटला अशा भावना जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या .
हा सोहळा महाराष्ट्र राज्यात नगर तालुक्यातील दहिगाव येथे पहिल्यांदाच राबवला गेला असेल अशी जेष्ठ नागरिकांकडून चर्चा ऐकायला मिळत होती.
काळा नुसार संस्कृती मध्ये बदल होत आहे. पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, धर्म, संस्कार, भगवंत गिता वाचन हे जपण आपलं आद्य कर्तव्य आहे. या सोहळ्या प्रसंगी प्रकाश म्हस्के यांची तरुण पिढीला नेहमी शिकवणं असते.
या ठिकाणी ह.भ.प रामदास महाराज रक्ताटे दादा यांच्या मधुर वाणीतून प्रवचन झाले. ह.भ.प आन्हाड महाराजांनी समाजप्रबोधन माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम चालू असतात तसेच आज हि त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला .
या विशेष कार्यक्रमासाठी, साहेबराव म्हस्के, प्रकाश म्हस्के, वसंत म्हस्के, डॉ.राजेंद्र म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के, माजी सरपंच जयवंत शिंदे, मधुकर म्हस्के, कृष्णा म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शिवा म्हस्के, प्रमोद म्हस्के, उमाकांत जावळे, माजी सरपंच सुदाम चंदने ,माजी पोलीस पाटील नाना म्हस्के, श्री राम ट्रस्ट अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के, सुखदेव वाघ, मोहन शिंदे यांसमवेत या कार्यक्रमाला महिलांचा विशेष सहभाग होता त्यात विमल म्हस्के,प्रमिला म्हस्के, डाॅ.अनिता म्हस्के, विजया म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

