प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-
रेणुकामाता विकास प्रतिष्ठान संचलित केज शहरात विविध व्यावसायिक आभ्यासक्रमासाठी विजयकांत मुंडे यांच्या नावे आसलेल्या जमिनिवर बांधलेली ईमारत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधल्या बाबतच्या तक्रारीत कुठलेच तथ्य नसून सदरील प्रकरण मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे मागील वीस वर्षांपासून प्रलंबित आसून सदरील प्रकरणाला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने स्थगिती दिलेली आहे.त्यामुळे संतुलन बिघडलेल्या तक्रारदार पिंटू ठोंबरेंने केलेले बेकायदेशीर आरोप मा.न्यायालयाचा अवमान करणारे आसल्याची तक्रार बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी केली आहे.
केज शहरातील जवळपास ६० % लोक हे गेल्या कित्येक वर्षांपासून इनामी जमिनिवर व्यावसायिक,निवासी,इमारती बांधून त्या ठीकाणी स्थायिक आहेत.परंतू तक्रारदार पिंटू ठोंबरे यांनी केजमधील दर्गाह हजरत मुजाबुद्दीन या संस्थेच्या सर्वे नं-१९/१,१९/२ (ए) मधील जागेवर जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंनी अतिक्रमण केल्याची बेकायदेशीर व बदनामीकारक हेतूपरस्पर तक्रार केली आहे.दरम्यान वक्फबोर्ड औरंगाबाद येथिल दावा क्र.८०/२०१६ मधील आदेशा विरूद्ध विजयकांत मुंडे यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सिव्हील रिव्हीजन अॅपलिकेशन नं.१६/२०१७ हा दाखल केला आसून सदरचा अर्ज (Appeal) हे उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.तसेच सदर अपिलमध्ये मा.उच्च न्यायालयाने वक्फबोर्ड औरंगाबाद यांचा दावा क्र.८०/२०१६ च्या आदेशास स्थगिती दिली आसून आजतागाय स्थगिती आदेश कायम आहे.दरम्यान गुंड प्रवृत्तीचे व मानसिक संतुलन बिघडलेले तक्रारदार पिंटू ठोंबरे हे राजकीय वैमानष्यातून रेणुकामाता विकास प्रतिष्ठान देवगाव या संस्थेस व वयक्तीक आम्हाला त्रास देण्यासाठी व बदनामी करण्यासाठी रोजच नवनविन बेकायदेशीर तक्रारी करणे त्यांचा उद्योगच झाला आसून त्यांनी केलेली तक्रारी या पुर्णता बेकायदेशीर व मा.न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधाचा अवमान करणारे आसल्याचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मानसिक संतुलन बिघडलेल्या तक्रारदाराने बेकायदेशीर आरोप करू नयेत..
तक्रारदार पिंटू ठोंबरे दररोज उठ-सुठ रेणुका माता विकास प्रतिष्ठानच्या विरोधात तक्रारी करून बदनामी करण्याचे कटकारस्थान रचत आसून तक्रारी करणे हा त्यांचा रोजचा उद्योगच बनला आहे.त्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारी किती तथ्यहीन आहेत हे जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.
सदरिल प्रकरणात तक्रारदारा विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार..
सदरील प्रकरणात परिपूर्ण माहीती न घेता फक्त प्रसिद्धीसाठी व रेणुकामाता विकास प्रतिष्ठानला बदनाम करण्यासाठी विविध वृत्तमान पत्रातुन आक्षेपार्ह मजकूर छापून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी तक्रारदारा विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आसल्याची प्रतिक्रीया जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी दिली आहे.

