shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाॅ.सुखदेव तुकाराम धोत्रे (विभाग प्रमुख स्थापत्य, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे ) यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा;
ठाणे:- आपल्या वडार समाजातील डाॅ सुखदेव तुकाराम धोत्रे (विभाग प्रमुख स्थापत्य, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे  ) हे दिनांक 30/11/2021रोजी 33 वर्ष सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झाले. त्या निमित्ताने दिनांक 1/12/2021 रोजी संस्थेतर्फे सेवा पुर्ति सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप मॅडम यांनी केले.  सुरवातीला   डाॅ सुखदेव तुकाराम धोत्रे  यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. व तसेच त्यांना शाल श्रीफळ व पोशाख  व ऊज्वला धोत्रे यांना  साडी  देऊन सन्मान करण्यात आला. 

या वेळी श्री संतोष जाधव, श्री भोर, विलास चौधरी, संगम गायकवाड, श्री पगारे,डाॅ स्वार, डाॅ मोतलिग, सोरदे मॅडम,  कसुल्ला मॅडम, सावंत सर, अंबाडेकर सर आणि सानप सर, नारखेडे सर आणि महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डाॅ सुखदेव धोत्रे यांनी  आपले विचार व्यक्त करताना सेवा कालावधीत वेगवेगळ्या संस्थेत आलेले अनुभव माहिती सांगितली .  या कार्यक्रमाला  संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित  होते.
close