अहमदनगर प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका यांच्या विशेष प्रयत्नातून संत गाडगेबाबा पुण्यतिथी दिनी तालुक्यातील नांदुखी बुद्रुक गावचे प्रहार शाखा उपाध्यक्ष विक्रम दाभाडे पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आदिवासी समाजातील गोरगरीब भगिनींच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल इतका किराणा वितरण करण्यात आले आहे. अत्यंत गरीब, मोलमजुरी करणाऱ्या, भूमिहीन तसेच निराधार अश्या प्रवर्गात असणाऱ्या केलवड येथील आदिवासी महिलांना या किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पावलावर; पाऊल ठेऊन, राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब, निराधार, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर या समाजघटकांसाठी अविरतपणे सेवाकार्य सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे.
आदिवासी महिलांच्या घरी किराणा वितरण केल्यानंतर ; "आमच्या अठराविश्व दारिद्र्यपाई आम्हाला दिवाळीत सुद्धा इतका किरणामाल घरात आणता आला नाही मात्र या पोरांनी उशिरा का होतं नाही पण आमच्या घरची दिवाळी गोड केली असे भावुक व आशीर्वाद'रुपी उद्गार या महिला भगिनींच्या तोंडून व्यक्त झाले. तसेच यावेळी नांदुखी बुद्रुक युवक शाखाद्यक्ष म्हणून सोमनाथ चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली .
या उपक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके पाटील, दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे, तालुका मार्गदर्शक सेवानिवृत्त मेजर सुनील देशमुख, सल्लागार सेवानिवृत्त मुख्याधिकारी गुळवे, सचिव सुधाकर डांगे, तालुका संघटक वसंत काळे, साकुरी शाखाध्यक्ष सतीश रोहोम, रावसाहेब दाभाडे, जनार्धन चौधरी, सोमनाथ चौधरी तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

