shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टोल बंद आंदोलनाचा इशारा देताच गणेश नागपुरे यांना टोल व्यवस्थापनाने दिले नियुक्तीचे पत्र..

टोल बंद आंदोलनाचा इशारा देताच गणेश नागपुरे यांना टोल व्यवस्थापनाने दिले नियुक्तीचे पत्र...

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील गणेश नागपुरे यांना टोल व्यवस्थापनाने बेकायदेशीर पणे काढून टाकले होते. त्या विरोधात त्यांनी १८ डिसेंबर २०२१ पासून अमरण उपोषण सुरू केले होते.
त्याच दिवशी दुपार नंतर ऍड राहुल मखरे यांनी १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता इंदापूर टोल बंद करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे सकाळी १० वाजलेपासूनच पोलिसांनी टोल प्लाझावर मोठा बंदोबस्त ठेवला होता.
कार्यकर्त्यांची गर्दी वाढायला लागल्यावर पोलिस निरीक्षक मुजावर यांनी आंदोलनकर्ते व टोल व्यवस्थापन यामध्ये मध्यस्थी करून उद्या यातून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले होते.
त्यावेळी ऍड. राहुल मखरे यांनी पोलिसांचे उपोषणकर्ते गणेश नागपुरे यांचे बद्दल सहानुभूतीचे धोरण असल्याने त्यांची सहानुभूती आपल्याला गमवायची नाही त्यामुळे उद्या पर्यंत आपण आंदोलन स्थगित करू व उद्याही गणेश नागपुरे यांना कामावर रुजू करून घेतले नाही तर २० डिसेंबर २०२१ रोजी पासून टोल नाक्यावरील सर्व बुम काढून हा टोल नाका कायमस्वरूपी टोल फ्री करु , हे करत असताना कार्यकर्त्यांनी तुरुंगात बसण्याची तयारी ठेवावी असे जाहीर आवाहन केले असता कार्यकर्त्यांनी बुम काढण्याच्या आंदोलनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
पाटस व सरडेवाडी टोल प्लाझातील कामगारांच्यावर या व्यवस्थापनाने वारंवार अन्याय केला आहे. अनेक स्थानिक कामगारांना काढून टाकून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. आपण न्यायाची लढाई लढत आहोत , कोणत्याही कामगारावर अन्याय झाला तर आपण त्यांच्या पाठिशी शेवटपर्यंत उभे राहायचे आहे , माझ्या अनुपस्थितीत तुम्हाला हे आंदोलन करायचे आहे असे सांगून त्यांनी हे आंदोलन उद्या पर्यंत स्थगित केले होते.
या इशाऱ्याचा धसका टोल व्यवस्थापनाने घेतला होता.
इंदापूरचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरण व्यवस्थित हाताळले व १९ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता गणेश नागपुरे यांना १ जानेवारी २०२२ पासुनचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पोपट शिंदे , नगरसेवक अमर गाडे ,नगरसेवक गजानन गवळी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण ,  वडार पॅंथर संघटनेचे अनिल (अण्णा) पवार, राजू ताटे ,ऍड. सुरज मखरे , अजिंक्य जावीर , बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर , भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष नागेश भोसले ,  सूरज धाईंजे,गौश सय्यद , वसीम शेख , वसीम बागवान ,  रोहित ढावरे , अक्षय मखरे व इतर शेकडो सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी सक्रीय पाठिंबा दिला होता.  अन्यायाच्या विरोधात पक्ष संघटना बाजूला ठेवून एकत्र येण्याचे उदाहरण या आंदोलनाने समाजासमोर घालून दिले आहे.
close