अहमदनगर (प्रतिनिधी) संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांना मागदर्शन करून यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले हा सन्मान सोहळा सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे संगमनेर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर संपन्न झाला सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा *मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा* राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२१-२०२२ हा माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता कोरोनाच्या नियमांचे पालन करून सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला.
सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, क्रिडा,अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावेळी सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते मा बाबासाहेब पावसे,आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरू डॉ.रामकृष्णदास लहवितकर महाराज नाशिक आदर्शगांव राळेगणसिद्धी चे सरपंच लाभेश औटी यांच्या शुभहस्ते,मा.दिपक दादा पाटील, मा.ह.भ.प.राधाताई सानप महाराज, डॉ.राधेश्याम गुंजाळ, मा.राजाराम भापकर गुरूजी, मा.विजयकुमार तनपुरे महाराज, मा यादवराव पावसे, मा विजयाताई काचावार, मा.एकनाथराव ढाकणे,मा.धनंजय डि.विसपुते, सौ.प्रमिला एखंडे, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, मा.काशिनाथ पावसे आदींची उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले या पुरस्काराबद्दल सर्व मान्यवरांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून चाहत्यांकडून त्यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

