शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):-
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय जनता पार्टी ओबीसी युवामोर्चाचे राहाता तालुकाध्यक्ष जितेंद्र माळवदे यांनी विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक आप्पा जंगम, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष अशोकजी दहिवळकर, भाजप किसान मोर्चा जिल्हासचिव विजयराव तांबे, श्रद्धाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशजी तांबे, ग्रा.पं सदस्य संतोष वाणी, अमित बनसोडे, भाऊराव तांबे, मच्छिंद्र तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

