shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भरणेवाडी येथे अनेक चाहत्यांनी शुभेच्छा देऊन केले अभिनंदन.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भरणेवाडी येथे अनेक चाहत्यांनी शुभेच्छा देऊन केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी संचालक म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची 'ब 'वर्ग प्रतिनिधी या जागेसाठी सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या चालू असलेले हिवाळी अधिवेशनयामुळे ते इंदापूरकडे शनिवारी रात्री आल्याने रविवारी(दि.२६) रोजी त्यांच्या निवासस्थानी भरणेवाडी येथे अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पुष्पगुच्छ, पुष्पहार,  वृक्ष इत्यादी भेट देऊन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. काही चाहत्यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ व सपकळवाडीतील तानाजी सोनवणे, सचिन पवार, अनिल सपकळ, महादेव सपकळ ,पृथ्वीराज सपकळ, गणेश सपकळ, ऋतिक सोनवणे, ऋषिकेश कांबळे . चाकाटी गावचे सरपंच संजय रुपनवर सदस्य आबासाहेब मारकड व इतर ग्रामस्थ तसेच निमगाव केतकी चे तात्यासाहेब वाडापूरे, ऍड. सचिन राऊत. वडापुरी येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती तालुका सेलचे संघटक सोमनाथ पवार, संसर गावचे वसंत जगताप व इतर ग्रामस्थ तसेच तालुक्यातील विविध गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देत अभिनंदन करीत होते.
close