shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे 'जीवनचिंतन'जीवनमूल्ये सांगणारे -गणेश वाडेकर

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  साहित्य हे माणसाला माणूसपण सांगणारे साधन असून डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे 'जीवनचिंतन 'हे वैचारिक ललितगद्य पुस्तक मानवी जीवनमूल्ये सांगणारे आणि सकारात्कता दृष्टी देणारे पुस्तक असल्याचे मत दोपोडी पुणे येथील जलसंपदा कार्यालयातील उच्चात्मक संकल्पचित्र व निर्मिती विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश वाडेकर यांनी व्यक्त केले. 

 
श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठान कार्यालयात डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या 'जीवनचिंतन 'पुस्तकावर मत व्यक्त करताना गणेश वाडेकर बोलत होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गणेश वाडेकर आणि सौ.कविता वाडेकर यांच्या सामाजिक आणि वाचन संस्कृती वाढविण्याच्या कार्याबद्दल सत्कार केला.यावेळी सौ.मंदाकिनी उपाध्ये,सौ. आरती उपाध्ये,प्रथमेश जोर्वेकर, निर्मिक उपाध्ये, मन्विता वाडेकर उपस्थित होते.


गणेश वाडेकर यांनी वाचनामुळे माणूस गतिशील आणि नीतीशील बनतो. माणूस वाचला की लेखन चांगले  करता येते असे सांगून डॉ. बाबुराव उपाध्ये आणि साहित्य मित्रपरिवार श्रीरामपूरात         वाचनसंकृती वाढविण्याचे  दिशादर्शक कार्य करीत असल्याबद्दल कौतुक केले.शेवटी सौ.आरती उपाध्ये यांनी आभार मानले.
close