राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकुशलते मुळे झगडेवाडी गावाला भरीव निधी - अतुल झगडे.
झगडेवाडीत १४ लक्ष रुपयाच्या रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकुशलते मुळे झगडेवाडी गावाला भरीव निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने गावच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलत आहे. असे मत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी झगडेवाडी गावातील पाण्याची टाकी ते पाझर तलाव रक्कम रुपये १४ लक्ष रुपयाच्या रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या हस्ते(दि.१६) रोजी पार पडला यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी किसन झगडे, मच्छिंद्र झगडे, श्रीकांत मोरे, डॉक्टर दादाराम झगडे ,बाळासाहेब झगडे ,लक्ष्मण झगडे, अजय मोरे, गोरख मोरे ,विजय झगडे, जोतीराम मोरे ,उत्तम झगडे, संतोष राजगुरू, रामचंद्र मोरे ,ज्ञानदेव मोरे ,बबलू मोरे, गणेश झगडे, सुरेश झगडे ,नवनाथ झगडे,अभिमन्यू झगडे, शंकर झगडे, लाला राजगुरू इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अतुल झगडे म्हणाले की, इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकुशलतेमुळे झगडेवाडी गावाला भरीव निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने गावच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलत आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी झगडेवाडी गावच्या विकासाबाबतीत क्रांतिकारी निर्णय घेतले आणि सढळ हाताने झगडेवाडी गावाला निधी प्राप्त करून दिला. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय ,स्मशानभूमी, सभामंडप, अंगणवाडी ,अंतर्गत सिमेंट रस्ते, अशा वेगळ्या स्वरूपाचा निधी भरणे यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्यामुळे गावात भौतिक सुविधा निर्माण झाल्या. गावाचा प्राथमिक गरजा बर्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच झगडे पुढे म्हणाले की, लवकरच झगडेवाडी गाव तालुक्यामध्ये विकासाचं मॉडेल म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सर्व रस्ते पक्के करणार, ड्रेनेज लाईन तयार करणार आहोत. गावामध्ये फिल्टर चे पाणी लवकरच सर्व नागरिकांना देणार आहोत . गावात प्रवेश करताना सुंदर अशी प्रवेश द्वार गावासाठी तयार करणार आहोत .अजूनही काही भागातल्या अंतर्गत रस्ते राहिलेत ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आमचा आहे. गावात खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे धेय्य ठेवलेल आहे अशा अजून वेगवेगळ्या पद्धतीने गावाचा चौफेर विकास करून झगडेवाडी गाव हे एक आदर्श मॉडेल तयार करण्याचा मानस या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व युवक वर्ग ,प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण केल्या शिवाय आम्ही ग्रामस्थ राहणार नाही . असा मानस आम्ही ग्रामस्थांनी केलेला आहे.

