shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळकोठा बु।। येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू..

 शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा 
प्रमोद चौधरी एरंडोल, जिल्हा जळगाव 
दिनांक ०५ डिसेंबर २०२१.
एरंडोल :- तालुक्यातील पिंपळकोटा बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीत पडून एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.
      
याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या पिंपळकोटा बुद्रुक येथे रवींद्र साहेबराव पाटील वय 35 वर्षे हा आपल्या आई-वडील पत्नी एक मुलगा व मुलगी सह राहतो. व गावातीलच लेंडी फॅक्टरीमध्ये कामात जातो. दिनांक 13 डिसेंबर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये रवींद्र साहेबराव पाटील वय 35 हा पडल्यामुळे गावातील लोकांनी आरोळारोळ केली म्हणून चुलतभाऊ शंभुसिंग पाटील हे तात्काळ विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना खात्री झाली की रवींद्रच आहे म्हणून त्यांनी गावातील राजेंद्र बाबुलाल पाटील नंदू रामदास पाटील एकनाथ भिकारी पाटील या सर्वांनी मिळून रवींद्र साहेबराव पाटील यास लोखंडी विलायचीने विहिरीतून बाहेर काढले व त्यास गावातील बंटी बडगुजर यांच्या आयशर गाडीने ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले त्या ठिकाणी डॉ. कैलास पाटील त्या तपासून मयत झाल्याचे घोषित केले.

शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मयत रवींद्र पाटील यांचेवर डॉ.मुकेश चौधरी डॉ. तन्मय महाले यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.दरम्यान मयत रवींद्र पाटील यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार वर्षाची मुलगी व दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

एरंडोल पोलीस स्थानकात शुक्रवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास शंभूसिंग अमरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पो.हे का महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहे.

close