shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मध्ये भीमज्योतीचे भव्य स्वागत.. आर. पी. आय, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित आघाडी व इतर संघटनेच्या वतीने इंदापूर नगरपालिकेच्या समोर भव्य स्वागत करून केला भीमसैनिकांचा सन्मान.

इंदापूर मध्ये भीमज्योतीचे भव्य स्वागत.

बाबा चौक इंदापूर येथे आमचे मेंबर मित्र परिवार यांनी तर  आर. पी. आय, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित आघाडी व इतर संघटनेच्या वतीने इंदापूर नगरपालिकेच्या समोर भव्य स्वागत करून केला भीमसैनिकांचा सन्मान. 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी दादर मुंबई ते बार्शी सोलापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पायी भिमज्योत आयोजन करण्यात आले असून दिनांक १ डिसेंबर रोजी ही भीम ज्योत दादर चैत्यभूमी येथून ३० भीमसैनिकांचा साह्याने सिद्धार्थ मित्र मंडळ बार्शी व सुधाकर कांबळे मित्र परिवार यांच्यावतीने पायी निघाली असून पहिला मुक्काम कामठे पनवेल येथे, दुसरा मुक्काम कामशेत मावळ ,तिसरा मुक्काम हडपसर येथे तर चौथा मुक्कामासाठी दिनांक ४ डिसेंबर रोजी इंदापूर येथे सायंकाळी सात वाजता बाबा चौक या ठिकाणी भिमज्योत आली असता आमचे मेंबर मित्र परिवार इंदापूर यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
 यावेळी अनिल पवार, पिंटूसेट घोडके, दुर्गा शिंदे, लखन चौगुले, रोहिदास पवार, बाबासाहेब विटेकर, अनिल चौगुले, शिवाजी चव्हाण, भारत चौगुले, व इतर यावेळी उपस्थित होते.
 यानंतर ही भीमज्योत घेऊन भीमसैनिक इंदापूर नगरपालिका समोर महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भीमसैनिकासह इंदापूर नगरीतील बाळासाहेब सरवदे, शिवाजी मखरे, संदीप कडवळे, अनिल पवार, ॲड. समीर मखरे ,प्रशांत शीताप, पिंटूसेठ घोडके, हनुमंत कांबळे, भिमज्योतीचे सुधाकर कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला व भीमसैनिकांचा स्वागत करून सन्मान केला. यानंतर आंबेडकरनगर येथे संध्याकाळचे स्नेहभोजन बुद्ध विहार या ठिकाणी अनिल पवार यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी सर्व संघटनेच्या वतीने अनिल पवार यांनी अन्नदान केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे नगरसेविका राजश्री अशोक मखरे हे उपस्थित होते.
 सदर मुक्काम बुद्ध विहार या ठिकाणी झाला तर दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ॲड. राहुल मखरे व मखरे परिवाराच्या वतीने नाष्टा करून सर्व भीमसैनिकांचा सन्मान राहुल मखरे यांनी केला. यावेळी अनिल पवार ,पिंटूसेठ घोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.
 सदर भीमज्योत कुर्डवाडी येथे आज मुक्कामास असून दिनांक ६ डिसेंबर रोजी बार्शी येथे सकाळी ११ वाजता महापरिनिर्वाण दिनाला पोहोचणार आहे. अशी माहिती सुधाकर कांबळे  यांनी दिली.
close