shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपच्यावतीने बारामती येथे कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न.

तेजपृथ्वी ग्रुपच्यावतीने बारामती येथे कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न.



 इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी  त्रिमूर्ती मंगल कार्यालय बारामती येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार २०२०-२१ हा सोहळा अतिशय दिमाखदारपणे पार पडला.
कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून उल्लेखनीय कामगिरी केली असे आरोग्य अधिकारी, आशा वर्कर समाजसेवक, पत्रकार यांना तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून कोरोना युद्धा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
हा उपक्रमाचे आयोजन तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात तसेच नानासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तेजपृथ्वी ग्रुपचे पदाधिकारी राहुल नाकाडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, पिडीसीसी बँकेचे संचालक मदन (नाना) देवकाते, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग (तात्या) मारकड, तेजप्रुथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात, बारामतीचे सुप्रसिद्ध डॉ.भोईटे, सेवांतीलाल दोशी, कोटक महिंन्द्रा बँक मॅनेजर दत्तात्रय मदने , फिल्म क्षेत्रातील अनेक मंडळी तसेच तेजप्रुथ्वी ग्रुपचे गणेश शिंगाडे , दादासाहेब हेगडकर, सुधीर पाडुळे ,अनिताताई ताठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
close