प्रलंबितअसलेले शेततळ्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली माहिती.
शनिवार दिनांक ४ डिसेंबर रोजी अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्यासोबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली व लेखी निवेदन दिले . त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भरणे यांना सांगितले की' मागेल त्याला शेततळे ' या योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यात शेततळी मंजूर झाली. परंतु २०१९ पासून कोरणामुळे हे अनुदान लाभधारकांना मिळाले नाही. त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अस्तरीकरण केले .परंतु अनुदान मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या निकषामुळे तांत्रिक अडचण प्रशासनापुढे निर्माण झाली आहे .त्यामुळे अनेक लाभधारक असून देखील कोणीही अनुदान घेण्यासाठी पात्र होत नाही. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले शेततळ्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू व प्रशासकीय तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करू अशी ग्वाही दिली.

