shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेनेच्या पदाधिका-यांनी शिव सहकार सेनेला सहकार्य करून इंदापुरात सहकार सेनेची ताकत वाढवावी - सचीन अहिरइंदापूर तालुक्यात शिव सहकार सेनेच्यावतीने ३६ ग्रामसंघटकांच्या नियुक्त्या.

शिवसेनेच्या पदाधिका-यांनी शिव सहकार सेनेला सहकार्य करून इंदापुरात सहकार सेनेची ताकत वाढवावी - सचीन अहिर

इंदापूर तालुक्यात शिव सहकार सेनेच्यावतीने ३६ ग्रामसंघटकांच्या नियुक्त्या.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात शिव सहकार सेनेच्यावतीने ग्रामसंघटकांच्या नियुक्त्या ( दि. ४ डिसेंबर २०२१) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  , शिव सहकार सेना अध्यक्ष सौ शिल्पाताई सरपोतदार यांच्या आदेशानुसार सचिन अहिर संपर्कप्रमुख पुणे जिल्हा व महेश पासलकर जिल्हा प्रमुख शिवसेना पुणे , प्रदीप खोपडे संपर्क प्रमुख शिव सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र, रमेश  जाधव संघटक पुणे जिल्हा,  इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता शिवशंभो पॅलेस वरकुटे पाटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील गाव निहाय शिव सहकार सेनेच्या ३६ ग्रामसंघटक पदाच्या नियुक्त्या इंदापूर तालुक्यातील शिव सहकार सेना संघटक सुरज काळे यांच्या वतीने करण्यात आल्या .
यावेळी विशाल बोंद्रे जिल्हा समन्वयक पुणे, भीमराव  भोसले जिल्हा समन्वयक पुणे, संजय काळे उपजिल्हाप्रमुख पुणे, नितीन शिंदे तालुका प्रमुख शिवसेना इंदापूर, दुर्वास शेवाळे हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट  आणि जनरल कामगार सेना  संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य , ॲड नितीन कदम संयुक्त सरचिटणीस व कायदेशीर सल्लागार हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना पश्चिम महाराष्ट्र,महादेव सोमवंशी शहर प्रमुख इंदापूर, आप्पासाहेब डोंगरे उपतालुकाप्रमुख इंदापूर, सुदर्शन रणवरे संघटक शिवसेना इंदापूर तालुका. सचिन इंगळे युवा अधिकारी इंदापूर तालुका ,सुदर्शन साखरे उप तालुका प्रमुख,विजय शिरसट उप तालुका प्रमुख,संदीप चौधरी उप तालुका प्रमुख,अरुण पवार समन्वयक इंदापुर अंकुश गलांडे पळसदेव बिजवडी विभाग प्रमुख, हेमंत भोसले बिजवडी उपविभाग प्रमुख, सौ पुष्पाताई घोरपडे संघटिका  महिला आघाडी इंदापुर तालुका इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सचीन अहिर म्हणाले की,
इंदापुर तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी शिव सहकार सेनेला सहकार्य करून इंदापुरात सहकार सेनेची ताकत वाढवावी त्यामुळे इंदापुरची  शिवसेना अधिक बळकट होईल. 
तसेच इंदापुर तालुक्यातील सहकार सेनेचे काम चांगल्या प्रकारे चालु आहे व अशाप्रकारे काम सहकार सेनेचे राहीले तर इंदापुर तालुक्यातील सर्व सहकाराच्या निवडणुका शिव  सहकार सेना पूर्ण ताकतीने लढविणार आहे असे मत प्रदीप खोपडे संपर्क प्रमुख शिव सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र यांनी जाहीर केले.
या नितीन शिंदे यांनी सहकार सेनेचे इंदापुर तालुकातील काम चांगल्या प्रकारे चालु आहे व सहकार सेना वाढीसाठी व सहकारातील निवडणुकीत सहकार सेनेने निवडणुक लढविण्याची  तयारी दाखविल्यास   शिवसेना /युवासेना व इतर अंगिकृत संघटना सहकार सेनेस सगळ्याप्रकारे सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच सदर नियुक्त्या गावनिहाय प्राथमिक स्वरूपात छत्तीस ग्रामसंघटकांना देण्यात आले असून उर्वरित गावातील ग्राम संघटक लवकरच निवडले जातील आणि शिवसेनाप्रणीत शिव सहकार सेना इंदापूर तालुक्यामध्ये प्रबळ करू व  तालुक्यात संघटन सर्व वरिष्ठांच्या विचाराधीन राहून भक्कम करण्याचा प्रयत्न राहील असे मत शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक सुरज काळे यांनी व्यक्त केले.

तसेच संजय काळे, भीमराव   भोसले, विशाल बोंद्रे, महेश पासलकर, प्रदीप खोपडे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
close