shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पथदिव्यांमुळे प्रचंड वीजबिले येत असल्याने राज्य सरकार हैराण ; या पुढील काळात हायमास्ट दिवेच बसवायचे नाही..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ 
 
पथदिव्यांमुळे प्रचंड वीजबिले येत असल्याने राज्य सरकार हैराण ; या पुढील काळात हायमास्ट दिवेच बसवायचे नाही..!! 

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर हायमास्ट पथदिव्यांमुळे प्रचंड वीजबिले येत असल्याने राज्य सरकार हैराण झाले आहेत. थकीत वीज बिलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने अखेर ग्रामपंचायत हद्दीत या पुढील काळात हायमास्ट दिवेच बसवायचे नाही असा निर्णय घेतला आहे.बहुतांश ग्रामपंचायती आपल्या हद्दीत अनेक ठिकाणी हायमास्ट दिवे बसवितात, ज्याचे वीजेचे बिल अधिक येते. देयकांमध्ये अधिकच वाढ होऊ लागल्याने हायमास्ट दिवे बसविण्यावरच निर्बंध आणण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधिन होती, त्या नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना विविध योजनांतून अनुदान मंजूर करुन वितरण करणार्‍या कार्यालयांनी या अनुदानातून हायमास्ट बसविण्यास मान्यता देऊ नये असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे रस्त्यांवरील दिव्यांच्या वीज वापरात बचत करण्यासाठी दिवे एलईडीचे वारावेत व पथदिवे सौरउर्जेवर चालविण्याचाही प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. . सादर करण्यास नद. 31 डिंसेबर, 2021 पयंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close