भुक जिकडं घेऊन गेली तिथेच वसवले घरटे..;
तिथेच खुपसली भावणांची पहार..;
पाषानाला फोडुन दगडाला देतो देवाचा आकार..;
तरीही व्यवस्तेने केले गुन्हेगार..!
त्याचाच अंश आहे मी
मी आहे जातीवंत वडार...!!
ना जमीन ना जुमला ना गाडी बंगला..;
तरीही बाप लढला..;
लोखंडाच मनगट त्याचं
पिढीजात लढतोय लढाई अस्तित्वाची..!
कधिच मानली नाही हार
त्याचाच अंश आहे मी
मी आहे जातीवंत वडार..!!
आता नाही राहील्या दगड खानी
आजही वडार फिरतोय अन्न पाण्यासाठी अनवाणी..;
मनगटात आहे तीच ताकत
म्हणुन पहारीची लेखणी केली मी
मीही करतोय सुकतीच्या लेखणीने व्यवस्तेवर प्रहार..!
कधीच मानली नाही हार
त्याचाच अंश आहे मी
मी आहे जातीवंत वडार..!!
आकाश ऊर्फ तुकाराम सोनाजी सुपारे
वडार गल्ली शेवगांव. अ. नगर

