नगर । प्रतिनिधी :-
सविस्तर माहिती अशी की, पंचायत समिती नगर येथे भारत सरकारची पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल प्रात्यक्षिकाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले, सदर योजनेअंतर्गत मिळणारा निधी अत्यंत कमी व तुटपुंजा असल्याने लाभार्थ्यांना घर बांधताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल पूर्ण होत नाही. असे मान्यवरांनी आपले मत नोंदविले व निधी वाढवून मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे देखील सांगण्यात आले.
यावेळी गट विकास अधिकारी यांनी देखील निधी वाढवून मिळावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले .यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुखशिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, पंचायत समितीचे सभापती उपसभापती व सर्व सदस्य, महा विकास आघाडीचे विविध मान्यवर, माजी सरपंच विश्वासराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळकर, योजनेची लाभार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.

