shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र संघाने सर्वात जास्त स्वर्ण पदक जिंकत विजेतेपद पटकावले...!!


मुंबई । भारतातील एकूण २९ राज्यातील ३७० खेळाडूंनी. सहभाग नोंदवला. या मध्ये महाराष्ट्र संघाने सर्वात जास्त स्वर्ण पदक जिंकत विजेतेपद पटकावले. तर पंजाब आणि तेलंगणा ने देखील चुरशीची लढत देत. दुसऱ्या क्रमांकाचे मान मिळवले. विशेष म्हणजे महाराष्ट्र संघाच्या या विजयी लढ्यात अहमदनगर च्या १२ खेळाडूंनी समभाग नोंदविला आणि. ६ स्वर्णपदक , ९ रौप्यपदक , तर ७ कांस्य पदकांची कमाई करत. महाराष्ट्र संघाच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली. 

यामध्ये झारा शेख (२ स्वर्ण) , आलिया सय्यद (१ स्वर्ण १ रौप्य) , याहया सय्यद (१ स्वर्ण १ रौप्य) , हुझेफ शेख १ स्वर्ण १ कांस्य) अरकम सय्यद (२ रौप्य) ,    अब्दुल्ला सय्यद (२ रौप्य ) , 
अब्दुल्लरहमान सय्यद (१ रौप्य १ कांस्य ) , अरफा शेख (२ रौप्य) अरिबा शेख (१ कांस्य) , आसरार सय्यद (१ रौप्य ) माही शेख (१ कांस्य) , मोहम्मद तासीन सय्यद (२ कांस्य) हे अहमदनगर संघातील विजेत्यांची नावे आहेत.

या उत्कृष्ट कामगिररीची दखल घेत अहमदनगर च्या युथ कराटे फेडरेशन चे आयोजक समिती कडून भरभरून कौतुक करत. उत्कृष्ट टीम सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी ऑल इंडिया कराटे स्पर्धा आयोजक समितीचे शिहान अरुण पाईकडे , प्रमुख पाहुणे आमदार अंबादास दानवे , नितिन सूर्यवंशी , आदी मान्यवरांनी अहमदनगर चे आंतरराष्ट्रीय कराटेपटू आणि कोच सबील सय्यद , आणि साहिल सय्यद यांचे भरभरून कौतुक केले. 

गेली काही वर्षे सबील सय्यद आणि साहिल सय्यद हे युथ कराटे फेडरेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्याच सोबत युथ आयकॉन फाउंडेशन कडून विविध सामाजिक उपक्रम अंतर्गत महिलांना आणि मुलींना मोफत स्वरक्षणाचे धडे दिले जातात !

अहमदनगर शहरातील सर्वच विजेत्या खेळाडूंचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राची देखील आवड निर्माण झाली पाहिजे. मोबाईल मध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज विद्यार्थी पाच सहा वर्षाचा असताना जर आपण पुढील पंधरा वर्षानंतर होणार्‍या ऑलंपिक ची तयारी सुरू केली तर निश्चितच भारत ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकू शकेल !

सबील फरीद सय्यद
आंतरराष्ट्रीय कराटेपटू तथा कराटे प्रशिक्षक
close