शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
"जय जवान जय किसान" चा नारा सफल होण्यासाठी शरद पवार पंतप्रधान होण्याची गरज-मा.आ.नरेंद्र घुले..!!
अहमदनगर : देशाच्या राजकारणात शरद पवार हे आदर्श व चारित्र संपन्न नेतृत्व आहे.सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आणि गोरगरीब शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन योग्य निर्णय घेऊन सोडविणारा शरद पवार हा एकच नेता आहे.’जय जवान जय किसान’चा नारा सफल होण्यासाठी शरद पवार पंतप्रधान होण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचे 81 वा वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार दि.10 डिसेंबर रोजी भेंडा येथील नागेबाबा भक्तनिवास सभागृहात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर व राष्ट्रवादी,शिवसेना,राष्ट्रीय कॉग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष या महाआघाडी कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून श्री.घुले बोलत होते.
प्रा.सुरेंद्र रोडगे (परभणी),राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, भाऊसाहेब मोटे,पं.सं.नेवासा सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, तुकाराम मिसाळ, बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ,महिला अध्यक्षा सौ.संगीता गव्हाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.घुले पुढे म्हणाले,सर्वांना बरोबर घेऊन जनसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी, धरणग्रस्त शेतकऱ्यांची पाणी परवानगी प्रश्न, शेतीमालाचे भावा, आरक्षणाचा प्रश्न तसेच ग्रामीण भागाचा विकास याकामी शरद पवार साहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे .सत्ता हे साध्य नसून ते विकासाचे साधन आहे . आपले प्रश्न आपलीच माणसे सोडवत असतात म्हणुन राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवा असे आवाहन केले.
यावेळी प्रा.सुरेंद्र रोडगे (परभणी) हे पक्ष संघटना, महागाई, शरद पवार यांचे महिला विकास धोरण व त्यांचे कारकीर्दितील महत्वाचे निर्णय व शेतकरी कायदे या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस, सिमेंट यांच्यासह जीवनाश्यक वस्तुचे भाव प्रचंड वाढून महागाई वाढली. या विषयी जनजागृती करून केंद्राच्या फसव्या घोषणांचे काय झाले ? हे विचारले पाहीजे. तसेच जनसामान्यांत पर्यंत शरद पवारसाहेब यांच्यासह आपल्या पक्षाचे , नेत्यांचे विचार पोहचविले पाहिजेत.
नेवासा तालुका शिवसेना अध्यक्ष मच्छिद्र म्हस्के,माजी सभापती कारभारी जावळे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके,अनिल अडसूळे,मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे,प्रा.नारायण म्हस्के,शिवाजी कोलते,जनार्दन कदम,अशोकराव मिसाळ, जनार्दन पटारे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव ढगे,नेवासा शहराध्यक्ष कृष्णा गायकवाड, किरण काळे,गफूरभाई बागवान,अमोल अभंग,अशोक वायकर,भीमराज शेंडे,प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,तालुकाध्यक्ष जालिंदर आरगडे,बाळासाहेब नवले,एकनाथ भुजबळ,सचिन नागोडे,गोरक्षनाथ कापसे, भाऊसाहेब चौधरी,रामकृष्ण आठरे,बबनराव पिसोटे, शिवाजीराव मते,अंबादास गोंडे,लक्ष्मण बनसोडे, कडूभाऊ तांबे, बाबासाहेब घुले,सोमनाथ कचरे,सागर महापूर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे यांनी स्वागत केले.भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.दत्तात्रय खाटीक यांनी आभार मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

