shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा हत्यारासह कर्जत पोलिसांच्या ताब्यात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१


अहमदनगर ब्रेकिंग :  प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार..!!
किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा हत्यारासह कर्जत पोलिसांच्या ताब्यात..!!
अहमदनगर : कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत वाद होऊन प्रकरण गोळीबार करण्यापर्यंत गेले. सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही. गोळीबार करणारा संदीप मांडगे याला पोलिसांनी अटक केली.
भरत नामदेव मांडगे यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.


 
कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थानमध्ये सुमारे ७५ एकर क्षेत्र आहे. कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्याकडे या जमिनीच्या वादाबाबत दावा दाखल झालेला आहे. उप विभागीय दंडाधिकारी


कार्यालयासमोर संदिप छगन मांडगे, सचिन छगन मांडगे (दोन्ही रा. रेहकुरी, ता. कर्जत) हे दोघे कामकाजासाठी आले होते. त्यावेळी दोघांत वाद झाला. संदीप मांडगे याने फिर्यादी भरत मांडगे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणही केली.


 
दोघांमध्ये ही झटापट सुरू असताना संदीप मांडगे याने कंबरेचे पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यामुळे धावपळ उडाली. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. गोळीबार केल्यानंतर संदिप मांडगे तेथून निघून गेला, असे भरत मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
 ✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 

close