दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बेकायदेशीर बांधकामाची चौकशी होऊन दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी..!
जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून सुरू होते प्राणांतिक उपोषण..!
अहमदनगर । प्रतिनिधी : गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू होते.लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा..!
जिल्हा परिषद कार्यालयासमोर दहिगांव -ने तालुका शेवगाव येथील १-१२-२०२१ रोजी झालेल्या एक दिवसाचे प्रांणातिक उपषोण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यानंतर या उपोषणाला स्थगिती दिली होती.परंतु कुठलीही कारवाई केली नाही.दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बेकायदेशीर झालेले बांधकाम कुठल्याही प्रकारचा ७/१२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नसतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आरोग्य विभाग जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी कसकाय दिला.
गेल्या पन्नास वर्षापासून वि.वि.सेवा सहकारी सोसायटी दहिगांव-ने तालुका शेवगाव यांच्या नावे ७/१२ आहे व होता त्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी बांधकाम केलेच कसे? व कोणाच्या सांगण्यावरून केले. या भ्रष्टाचारी अधिकारी व पद अधिकारी यांची योग्य पध्दतीने चौकशी करुन दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. याकरिता शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय एस.राजेभोसले व प्रवीण शंकर खोमणे प्राणांतिक उपोषणाला पाच दिवसापासून बसले होते. या उपोषणा संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या समोर चर्चा होऊन तोंडी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी तोंडी सांगितले की पाच दिवसात योग्य कारवाई करू असे तोंडी आश्वासन दिले. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे साहेब उपस्थित होते.
प्रवीण खोमणे यांनी सांगितले की लवकरात लवकर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे.जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिनांक 7 जानेवारी 2022 पासून जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या आवारात पुन्हा प्राणांतिक उपोषणाला बसणार आहोत.यानंतर आमचे काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहिल.

