shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून चारही उमेदवारांना मताधिक्य मिळेल - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून  चारही उमेदवारांना मताधिक्य मिळेल - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
 प्रतिनिधी: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कायम जनसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली असून बँकेच्या माध्यामातून खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व संचालक मंडळाने शेतकरी केंद्रबिंदू मानून कायम न्याय देण्याची भुमिका घेतली आहे.इंदापूर तालुक्यातील शेतकरी या बँकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुखावला आहे.त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून चारही उमेदवारांना मताधिक्य मिळेल असा विश्वास सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी दि.२ जानेवारी २०२२ रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दि.३१ डिसेंबर रोजी आपल्या भरणेवाडी येथील निवासस्थानी मतदारांसोबत उमेदवारांच्या उपस्थितीत बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.या बैठकीस “क” वर्गातून सुरेश घुले, “ड” वर्गातून दिगांबर दुर्गाडे,महिला वर्गातून निर्मला जागडे आणि पूजा बुट्टे पाटील हे निवडणुकीत उभे असलेले उमेदवार देखील उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की,देशात सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव बँक आहे.ज्या बँकेने कधीही राजकारणाला थारा न देता शेतकरी हित जोपासले. या बँकेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला गेला.सोसायटीच्या माध्यामातून विविध प्रकरणे मार्गी लावून शेतकऱ्यांची प्रगती झाली. इंदापूर तालुक्याच्या अर्थकारणात या बँकेची महत्वाची भुमिका असून या बँकेच्या माध्यामातून तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती झाली हे नाकारता येणार नाही. उद्याच्या निवडणूकीत या तालुक्यातील शेतकरी सहकार पॅनलच्या पाठीशी उभा असून इंदापूर तालुक्यातून या चारही उमेदवारांना मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, दि.२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ पर्यंत मतदान पार पडत आहे.इंदापूर तालुक्यातून अ वर्गाचे १८४, ब वर्गाचे १६,क वर्गाचे ४७ तर ड वर्गातून ११५ असे एकूण ३६२ इतके मतदान असून आपणांला दुपारी बारा वाजण्यापूर्वी आपल्या तालुक्यातील सर्व मतदान पार पाडायचे आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इंदापूर तालुक्यातून संपूर्ण मतदान पूर्ण झाले असा निरोप द्यावयाचा आहे.या निवडणूक प्रक्रियेत क वर्ग, ड वर्ग आणि महिला उमेदवारांना इंदापूर तालुक्यातून आपण मतदान करणात आहोत.त्यासाठी सहकार पॅनेल च्या कपबशी या चिन्हावर आपण शिक्का मारावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात, आमदार यशवंत माने,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रवीण शिंदे,सोनाईचे दशरथ माने,मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले,मंगलसिध्दीचे राजेंद्र तांबिले,जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे,बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फरतडे, छत्रपतीचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप,व्हाईस चेअरमन अमोल पाटील, मा.पं.समिती सभापती प्रशांत पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,जिल्हा उपाध्यक्ष डी.एन.जगताप,छत्रपतीचे रणजितनिंबाळकर,लक्ष्मण ,अनिल बागल,गणेश झगडे, नवनाथ रुपनवर,शिवाजीराव पानसरे,सागर मिसाळ, बाळासाहेब करगळ यांसह राष्ट्रवादीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, इंदापूरचे सर्व आजी माजी नगरसेवक आणि जवळपास सर्वच मतदार बंधु भगीनी,विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी कोरोनाच्या नियमाचे सर्व पालन करण्यात आले.कार्यक्रमानंतर राज्यमंत्री भरणे, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांसह सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला
close