shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेनेचा इंदापुर तालुक्यात झंझावातजिल्हा परिषद गटामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी विधानसभा संपर्क प्रमुख दयानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यात बैठका

शिवसेनेचा इंदापुर तालुक्यात झंझावात

जिल्हा परिषद गटामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी विधानसभा संपर्क प्रमुख दयानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यात बैठका.
 
इंदापूर प्रतिनिधी:शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख दयानंद शिंदे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.त्याचा प्रारंभ (दि१० डिसेंबर ०२१) रोजी सकाळी इंदापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात युवासेनेची बैठक घेऊन करण्यात आला. सदर दौऱ्यामध्ये दयानंद शिंदे यांच्यासोबत जिल्हा समन्वयक विशालदादा बोन्द्रे, उपजिल्हाप्रमुख संजयजी काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार हे सहभागी झाले होते.
त्यानंतर दुपारी १२ वाजता पळसदेव - बिजवडी जिल्हा परिषद गटातील लोणी येथे बैठक झाली. यावेळी गटातील विभागप्रमुख अंकुश गलांडे, उपविभाग प्रमुख हेमंत भोसले, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी ०३ वाजता निमगाव - निमसाखर जिल्हा परिषद गटाची बैठक निमगाव येथील सावता माळी मंदिरात पार पडली. यावेळी निमगाव येथील युवा शिवसैनिक सोमनाथ आप्पा शेंडे यांची निमगाव-निमसाखर गटाच्या विभागप्रमुखपदी निवड दयानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायं ६ वाजता काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटाची बैठक रेडा येथे पार पडली. यावेळी गटातील उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के, उपविभागप्रमुख विजय तरंगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काटी वडापुरी जि.प.गटाच्या विभागप्रमुखपदी विजय भालचंद्र मोरे यांची तर वडापुरी पंचायत समिती गणाच्या उपविभाग प्रमुखपदी तात्या बबन पाटील यांची निवड करण्यात आली.
रात्री ७ वाजता बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची बैठक भोडणी येथे पार पडली. यावेळी गटाचे उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, उपविभागप्रमुख कांबळे सर, शाखाप्रमुख अमोल शिंदे, समीर मुलाणी, विशाल चौधरी, जगताप आदी उपस्थित होते.

रात्री 8 वाजता इंदापूर शहर पदाधिकारी यांची बैठक इंदापूर येथे शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी शहरप्रमुख महादेव सोमवंशी, संघटक अवधूत पाटील , उपशहर प्रमुख बंडु शेवाळे, माथाडी कामगार संघटनेचे राजू शेवाळे, शाखा प्रमुख संतोष क्षिरसागर  यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
close