shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत रोहित्राचा स्फोट ; मोठी हानी टळली..!!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.२७,हिंगोली जिल्ह्यातील औंढा (नागनाथ ) तालुक्यातील जडगाव शिवारामध्ये आज सकाळी शेता मध्ये उभ्या असलेल्या विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्यामुळे विद्युत रोहित्र आगीत जळून भस्मसात झाले आहे. तर या दरम्यान जवळ कोणी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. शेतामध्ये उभ्या असलेल्या शेतकर्‍यांनी आगीचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेर्‍यांमध्ये टिपले आहे. आगीचे लोट एवढी भयावह होते की पाच किलोमीटर अंतरावरून दिसत होते. सदरील प्रकार हा डीपी चेक करताना घडला आल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली आहे. 



मागिल वीस दिवसात याच ठिकाणी तीन विद्युत रोहित्र जळाले असून. बसवण्यात आलेला विद्युत रोहित्र हे यावर कुठलाही लोड न टाकता चेकिंग करत असताना रोहित्राचा स्पोट झाला आहे. महावितरणकडून कुठल्याही प्रकारे चेक न करता शेतकर्‍यानां डीपी देण्यात आला होता. विशेष म्हणजे महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीस आला आहे. सक्तीची वीज बिल वसुली करुन निकृष्ट दर्जाचे साहित्य शेतकर्‍यांना पुरवली जात असल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी केला आहे. पाण्याअभावी जडगाव येथिल शेतकर्‍यांची पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यात असे निदर्शनास येते की शेतामध्ये लाईटची सर्व कामे शेतकर्‍यांनाच करावी लागतात, वायरमन हा केवळ नामधारी राहत असल्याचे दिसून येते. फुज टाकणे असो किंवा लाईट मध्ये झालेला फॉल्ट असो हि सर्व कामे रात्री बेरात्री शेतकर्‍यांनाच करावी लागत आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवास धोका आहे होऊ शकतो.

close