shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्तमराव खुळे यांची तज्ञ संचालक पदी निवड..!


राहुरी । प्रतिनिधी :- शिक्षकनेते प्रा भाऊसाहेब कचरे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखालील,राज्यातील सहकारातील एक पथदर्शी असलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगरच्या तज्ञ संचालकपदी ब्राम्हणी येथील आदर्श माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री उत्तम हनुमंत खुळे यांची निवड झाली आहे.

नगर येथे सोसायटीच्या संचालक मंडळ बैठकीत तज्ञ संचालक पदी श्री खुळे यांची निवड करण्यात आली. श्री.खुळे हे या संस्थेचे सलग 12 वर्ष संचालक तर एक वर्ष अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक व शिक्षक नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी श्री खुळे यांना तिसऱ्यांदा पुन्हा संधी दिली आहे.श्री खुळे व सहकारी संचालक यांच्या प्रयत्नातुन राहुरी शाखे साठी 2011 साली स्वमालकीची इमारत झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांची मोठी सोय झाली आहे.

त्यांची निवड झाल्याने त्यांचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खा डॉ सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,जेष्ठ नेते ऍड सुभाषराव पाटील, डॉ बा बा तनपुरे सहकारी कारखाना चे चेअरमन श्री नामदेवराव ढोकणे, व्हा चेअरमन श्री दत्तात्रय ढूस,संचालक श्री उत्तमराव आढाव,श्री रविंद्र म्हसे,श्री रावसाहेब चाचा तनपुरे,पुरोगामी सहकार मंडळचे अध्यक्ष श्री किशोर जाधव सर,विद्यमान संचालक श्री संजय कोळसे,माजी चेअरमन श्री अर्जुनराव डुकरे, माजी चेअरमन श्री सतिशराव सप्रे,माजी संचालक व राहुरी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सखाहरी खेडकर, माजी संचालक श्री सोपानराव मगर,श्री नंदकुमार दिघे सर,भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री साहेबराव तोडमल सर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सर्जेराव पेरणे सर,श्री जालिंदर खडके सर,श्री रायभान काळे सर,श्री शिवाजीराव म्हसे सर,श्री पोपटराव आढाव सर,श्री प्रदीप तनपुरे सर,श्री दादासाहेब चोथे सर,श्री अशोक काळे सर,श्री सुदाम दिघे सर,आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तालुक्यातील सोसायटीच्या सभासदांमधुन अभिनंदन होत आहे.
close