shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तरच देश महासत्ता होईल - दिपक आगळे पाटील

अहमदनगर । प्रतिनिधी :- 
 महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनची आढावा बैठक व पदाधिकारी निवडीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांनी बैठकीत बोलताना सांगितले की आज राज्यात सामाजिक संस्थांची परिस्थिती खूपच वाईट आहे. 

बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे.बाकीच्या संस्था फक्त कागदावरच राहिल्या म्हणून या सर्व सामाजिक संस्थांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. यामुळे सामाजिक संस्थांना शासकीय अनुदान.सी.एस.आर.फंड. ऑडिट,वार्षिक अहवाल,चेंज रिपोर्ट करणे,राज्य शासनाचे व केंद्र शासनाच्या अनेक योजना राबविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी शेतकरी विषयक अभियान राबविण्यासाठी अशा अनेक गोष्टींची कमतरता असल्यामुळे संस्था बंद पडत आहेत, त्यामुळे देशाची संस्कृती व सामाजिक कार्य टिकून राहण्यासाठी सामाजिक संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तरच देश महासत्ता होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.दिपक आगळे पाटील यांनी बोलताना सांगितले.

 यावेळी कार्यक्रमासाठी प्रदेश उपाध्यक्षा सौ. विद्याताई बेनगुडे, प्रदेश सरचिटणीस सुनिल मतकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रकाश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अधिकराव जगताप,प्रदेश सचिव नितीन दांडगे, प्रदेश सचिव अभिषेक पटारे, जिल्हाध्यक्ष श्री.वसंत कर्डीले, अहमदनगर शहराध्यक्ष श्री.आण्णासाहेब बनसोडे,महिला जिल्हाध्यक्षा सौ.ऍड.अंजलीताई काळे, ऋषिकेश बेल्हेकर,जिल्हा कार्याध्यक्षा सौ.तारामतीताई दिवटे,ऋषिकेश येवले. कानिफनाथ सांवत.ऍड.अर्जुन काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close