स्व.मारुतीराव चोपडे कुटुंबियांचे राजवर्धन पाटील यांचेकडून सांत्वन.
फोटो:- ढेकळवाडी येथे स्व.मारुतीराव चोपडे यांच्या कुटुंबीयांचे राजवर्धन पाटील यांनी सांत्वन केले.
इंदापूर: प्रतिनिधी
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. मारुतीराव चोपडे (भाऊ) यांच्या कुटुंबीयांचे ढेकळवाडी येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भेट घेऊन शुक्रवारी (दि.१०) सांत्वन केले.
भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याचे प्रदीर्घकाळ संचालक असलेले मारुतराव चोपडे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन भेटीत राजवर्धन पाटील यांनी चोपडेभाऊ यांचेशी कर्मयोगी शंकररावजी पाटील, स्व. राजेंद्रकुमार घोलपसाहेब तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. स्व. मारुतीराव चोपडे भाऊ जाण्याने सहकार चळवळ तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना या भेटीत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र चोपडे, विनोद चोपडे व चोपडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
___________________________

