पुणे । "खेड सेझ पंधरा टक्के प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मिटींगचे ठोस आश्वासन न मिळाल्यास अधिवेशन काळात मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करणार असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,प्रदेश सचिव,हरेश देखणे यांनी निवेदनात प्रतिपादन केले आहे...!
खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न गेले तेरा(१३) वर्षापासून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या संदर्भात वेळोवेळी आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. तरीही हा प्रश्न प्रलंबित आहे.
दि.२८/१०/२०२१ रोजी प्रादेशिक अधिकारी एम.आय.डी.सी. कार्यालय, पुणे. येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. ५/११/२०२१ दिवाळी पाडवा या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन तीव्र करण्यात आले होते. त्यावेळेस प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मीटिंग लावण्या संदर्भातील आश्वासन दिले होते. परंतु २२/१२/२०२१ पर्यंत त्याची पूर्तता केले नाही. दि. ९/१२/२०२१ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे, येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावण्या संदर्भात आश्वासन देण्यात आले परंतु अद्यापपर्यंत मिटिंग बाबत ठोस आश्वासन देण्यात आले नाही .
त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि सेझ बाधित शेतकरी यांच्या वतीने चालू हिवाळी अधिवेशन काळात मुंबई येथे मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे हरेश देखणे,प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जाहीर केले आहे. व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असे कळविण्यात आले आहे.
याआंदोलना संदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१) दि.५/११/२०२१ रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आंदोलनादरम्यान देण्यात आलेले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मीटिंग बाबतचे आश्वासन पूर्ण करून संयुक्त मिटींगचे आयोजन बाबत निश्चित तारीख मिळाली. व त्यामध्ये पंधरा टक्के परतावा प्रश्न सोडविण्यात यावा.
२) खेड डेव्हलपर्स लिमिटेड(K.D.l.) कंपनी बरखास्त करण्यात यावी.
३) पंधरा टक्के परतावा प्रश्न शासकीय पातळीवरच मिटला जावा. खाजगी पातळीवर कोणतेही व्यवहार होऊ नये.
४) सेझ प्रकल्पाची जमीन संपादनाच्या वेळेत दिलेली मुदत संपल्यामुळे शेतकऱ्यांना विनामोबदला जमिनी परत करण्यात याव्यात.
५) के. डी. एल, के.ई.आय.पी.एल .कंपन्यांची तसेच खेड शेज प्रकल्पाचे सर्वेसर्वा बाबा कल्याणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
अशा आशयाचे निवेदन संबंधितांना
हरेश देखणे मो.7498101158
काशिनाथ हजारे शेतकरी प्रतिनिधी,मो.8850028108 यांनी दिले आहे.

