शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
महाराष्ट्राची लाल परी धावणार कधी ?
शासन आणि एस. टी.कर्मचारी संपात तोडगा निघावा जनतेची मागणी..!!
अहमदनगर : गेले अनेक दिवसांपासून एस. टी. कर्मचारी यांनी आपल्या मागण्यांबाबत संप पुकारला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे, शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, अंध-अपंग व जनतेचे प्रचंड हाल होत आहे. खाजगी गाडी चालक, मालक जनतेची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. ज्यादा भाड्यामुळे जनता खरोखरच आर्थिक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही अजूनही सरकार दरबारी यावर काही तोडगा निघालेला दिसत नाही. शासन आणि कर्मचारी या दोघांच्या खेळात रस्त्या रस्त्यावर धावणारी आणि सुरक्षित प्रवास देणाऱ्या एस. टी. ला मात्र ब्रेक लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लवकरात लवकर तोडगा निघावा व पूर्ववत एस. टी. ने धाव घ्यावी अशी आशा आता जनता करत आहे. या अडचणीच्या काळात जनतेच्या भावना कुणी समजून घेणार का ?असा प्रश्न अआता समोर येत आहे.
अनेक दिवसांपासून रस्त्यावर धावणारी व सुरक्षित प्रवास देणारी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागणी आणि केलेल्या संपामुळे एस. टी. बंद आहे. त्यामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, तसेच विविध व्यावसायिक अपंग, वयोवृद्ध व्यक्ती यांना मात्र या बंद मुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
"गाव तेथे एस. टी. प्रवास" हे ब्रीद घेऊन चाललेली एस.टी. आज डेपोमध्ये धूळ खात पडली आहे. शहरी जनतेबरोबरच ग्रामीण जनतेला नाहक त्रास होत आहे. असाच हा संप सुरू राहिला तर यात शासन आणि कर्मचारी यांच्या नुकसाना बरोबरच राज्याच्या आर्थिक व्यवस्थेलाही मोठा फटका बसणार आहेच आणि याचे दूरगामी परिणाम जनतेला भोगावे लागणार आहेत.
एकंदरीत शासन आणि कर्मचारी यांना सदबुद्धि मिळो आणि लवकरात लवकर हा संप मिटो अशी आशा आता सर्वच जण मनी बाळगून आहेत. अन्यथा फार मोठ्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे. हे मात्र निश्चित...
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

