जिल्हा परिषद कार्यालय अहमदनगर समोर एकाच महिन्यात चौथ्यादा प्राणांतिक उपोषण सुरू
तिसऱ्या दिवशी प्राणांतिक उपोषण सुरुच..!
अहमदनगर प्रतिनिधी : जिल्हा परिषद कार्यालयासमोर दहिगांव -ने तालुका शेवगाव येथील १-१२-२०२१ रोजी झालेल्या एक दिवसाचे प्राणांतिक उपोषण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशी वरून कार्यवाही करू..! असे आश्वासना दिल्यानंतर या उपोषणाला स्थगिती दिली होती.
परंतु यानंतर कुठलीही कारवाई केली नाही.दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बेकायदेशीर झालेले बांधकाम कुठल्याही प्रकारचा ७/१२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नसतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी कोणत्या नियमानुसार दिला. गेल्या पन्नास वर्षापासून वि.वि. सेवा सहकारी सोसायटी दहिगांव-ने तालुका शेवगाव यांच्या नावे ७/१२ आहे व होता त्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी बांधकाम केलेच कसे व कोणाच्या सांगण्यावरून केले. या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. व दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे.
याकरिता शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय एस.राजेभोसले, व प्रवीण शंकर खोमणे जिल्हा परिषद आवारात प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत.
प्रवीण खोमणे यांनी "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" शी बोलताना सांगितले की लवकरात लवकर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही नाशिकला जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन देऊन उपोषण करू.

