शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा परिवारा कडून
अभिवादन ..
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा ,प्रमोद चौधरी एरंडोल, जिल्हा जळगाव दिनांक ०८ डिसेंबर २०२१
एरंडोल:-श्री.संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती एरंडोल शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. जहागीर पुरा येथे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळेस श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
त्याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती शालिक भाऊ गायकवाड ,एरंडोल काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय अण्णा महाजन, शिवसेना नेते आनंदा आबा चौधरी (भगत)एरंडोल तालुका तेली समाजाचे अध्यक्ष गुलाब भाऊ चौधरी,आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे,चंद्रकातं (बापु)चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आर डी चौधरी, आबा भाऊ चौधरी, निंबा दादा चौधरी, शांताराम भाऊ चौधरी, राजेंद्र भाऊ चौधरी, योगेश भाऊ चौधरी, रविंद्र भाऊ चौधरी, मुकेश भाऊ बडगुजर, दिपक भाऊ चौधरी, कैलास भाऊ चौधरी, जितू भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

