शिवलीला ट्रेडर्स या दुकानाची वाटचाल इंदापूर तालुक्यातील स्थानिक दुकान व्यावसायिकांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार - विलासराव वाघमोडे.
इंदापूर येथे शिवलीला ट्रेडर्सचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरालगत शिवाजीनगर परिसरात इंदापूर अकलूज रोड लगत शंकर बापूराव हुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली अजित हुबाले व विकास हुबाले यांनी होलसेल स्वरूपात स्टेशनरी मालाचे दुकान उभारले असून दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी माजी सभापती विलासराव वाघमोडे यांच्या शुभहस्ते व श्री बापूराव हुबाले, सौ.रतन हुबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी शुभेच्छा देताना विलासराव वाघमोडे म्हणाले की, शिवलीला ट्रेडर्स या दुकानाची वाटचाल इंदापूर तालुक्यातील स्थानिक दुकान व्यावसायिकांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार असून त्यांना अत्यंत सुलभ पद्धतीने माल पुरवण्याची सेवा या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होईल व इंदापूर तालुक्यात होलसेल दराने नामांकित मालपुरवठा करणारी शिवलीला ट्रेडर्स ही अग्रगण्याने ओळखले जाईल. त्या पद्धतीचे नियोजन या ट्रेडर्सचे हुबाले यांनी केले आहे. त्यांच्या या व्यवसायास व हुबाले परिवारास हार्दिक शुभेच्छा असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शंकर हुबाले सर, देवराज देशमुख, अंकुश कोळेकर, सौ.सुदामती हुबाले, विकास हुबाले ,अजित हुबाले इत्यादी उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात कर्मयोगी कारखान्याचे संचालक श्री.सतिश व्यवहारे, नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक,श्री. फलफले सर , पर्यवेक्षक श्री. भोईटे सर,श्री. जावीर सर,श्रीम.वाघमारे मॕडम व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

