प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक, जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस दरवर्षी एक जानेवारी या दिवशी साजरा होतो परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, एक जानेवारीला होणारा वाढदिवस रद्द करण्यात आला आहे तरी कार्यकर्ते, आप्त ,इष्ट, मित्रमंडळी, तसेच माझ्यावर प्रेम करणारी मंडळी यांनी हारतुरे, बुके, केक वगैरे आणू नये तसेच वाढदिवस साजरा होणार नाही.
याची नोंद घ्यावी असे जनविकास परिवर्तन आघाडी चे संस्थापक, जेष्ठ नेते हारूण भाई इनामदार यांनी सांगितले आहे, माझ्यावर केज शहरातील अठरापगड जातीतील जनता प्रेम करते व माझे कार्यकर्ते, मित्रमंडळी, तसेच आप्त इष्ट यांच्या शुभेच्छा चा स्विकार मी मनातून करत आहे तरी माझा एक जानेवारी या दिवशी होणारा वाढदिवसाचा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रद्द करन्यात आलेला आहे यांची नोंद घ्यावी असे आवाहन जेष्ठ नेते जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक हारूण इनामदार यांनी सांगितले आहे.

