शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१
एसटी संपाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी..!!
प्रतिनीधी :अजय गुजर ST संपाची नोटीस देणारे तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी ST कर्मचारी या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आज परीवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आणि अनिल परब यांच्या
सोबत ते पत्रकार परीषदेत सामिल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपणच संप सुरु केला आणि तो आता मागे घेत असल्याचं जाहीर केलं.पत्रकार परीषदेत ते म्हणाले, ‘ 21 ऑक्टोबर रोजी संघटनेने दिलेल्या नोटीस नुसार 3 नोव्हेंबरच्या
मध्य रात्री पासून कनिष्ठ एसटी कर्मचारी वेतन श्रेणी संघटनेने संप पुकारला एवढे दिवस संप सुरू आहे. 2 ते 3 वेळेस परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या काल शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी नवी दिल्लीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली तेव्हा
विलीनीकरणाबाबत त्यांनी मान्य करण्याचं ठरवलं विलीनीकरण करावं ही आमची प्रमुख मागणी आहे , आम्ही त्यावर ठाम असल्याचही अजय गुजर यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, ‘गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे.
20 जानेवारी 2022 समितीची मुदत तारीख आहे. न्यायालयात आज प्राथमिक अहवाल सादर झाला आहे 22 जानेवारीला समितीचा पूर्ण अहवाल येईल आज आम्ही मंत्र्यांची भेट मागितली होती त्यानुसार 2 वाजल्यापासून आता पर्यंत चर्चा झाली विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय येईल
तो आम्हा दोघांना मान्य असल्याचही गुजर म्हणाले.पगारवाढ वेतनश्रेणी चुकीची आहे याबाबत आम्ही सांगितलं, त्यावर सुधारणा करण्याचा चर्चा करून विचार करण्याच महामंडळाने सांगतील आहे. दरम्यान जे 54 आत्महत्या केलेलं कर्मचारी आहेत,
त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळ लवकर निर्णय घेईल, आर्थिक मदत 50 लाख आणि कुटुंबियातील व्यक्तीला तात्काळ नोकरीची आम्ही मागणी केली असल्याच गुजर यांनी सांगितलं.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

