गोरगरीब, कष्टकरी ,समान्य जनतेच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब - राजेंद्र प्रभाकर अर्जुन.
शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन दिना निमित्त विशेष लेख
मा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. पवार साहेब यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे.
इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवार साहेबांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून साहेबांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारसाहेबांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारसाहेबांचे मार्गदर्शक होते.
मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारसाहेबांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारसासेबांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवारसाहेब विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते. त्यानंतर १९८४ साली पवारसाहेब पहिल्यांदा खासदार झाले व त्यानंतर पुन्हा राज्याच्या राजकारणात येवुन चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तर पवार साहेबांच्या भोवती फिरू लागले त्यानंतर २६ जुन १९९१ रोजी साहेबांचा केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री पदी निवड झाली २००४ साली केंद्रीय कृषिमंत्री, २००९ साली केंद्रीय कृषिमंत्री , ग्राहकांच्या संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण आशा अनेक खात्यांच्या मंत्रीपदांचा साहेबांनी गोरगरीब कष्टकरी समान्य जनतेच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेत जानता राजा म्हणून सर्वसामान्य जनतेच्या काळजात घर केले राजकारणाबरोबर खेळाच्या क्षेत्रात ही पवारसाहेब मागे राहिले नाहीत २००५ साली ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले आणि सन २०१० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले
ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले त्या त्या वेळी पवारसाहेबांनी अग्रेसर भुमिका घेवुन त्या संकटाचा सामना केला मग तो किल्लारीचा भुकंप असो अथवा मुंबईचा बॉंबस्फोट आसो किंवा कोल्हापूर सांगलीचा महापुर असो अथवा कोकण किनारपट्टीवरील वाटळाचा फटका आसो की अवकाळी पावसाचा तडाखा पवारसाहेबांनी सत्तेत असो अथवा सत्तेच्या बाहेर आसो पण माझ्या शेतकरी राज्याला कामगार बांधवांना गोरगरीब कष्टकरी जनतेला नेहमीच मायेचा प्रेमाचा आधारच दिला आणि म्हणुनच ते माझ्यासारख्या असंख्य तरुणांचे आधारवड झाले आहेत
आजही वयाच्या ८२ वर्षात पदार्पण करताना तिशीच्या तरुणाला लाजवेल आस बळ आणि माझ्या महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी कार्य करण्याची उमेद खुप काही शिकवण देवुन जाते
आशा या ८१ वर्षाच्या तरुणाला वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या आणि समस्त इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने दीर्घायुष्याच्या खुप साऱ्या शुभेच्छा देतो आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की आदरणीय पवारसाहेब या भारतदेशाचे पंतप्रधान होवो.........
शुभेच्छुक :- राजेंद्र प्रभाकर अर्जुन (मा.ना.दत्तामामा भरणे फॅन क्लब चिखली)

