shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका भटके-विमुक्त जाती-जमाती सेलच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त माऊली आश्रमामध्ये मुलांना फळे व खाऊ वाटप.

इंदापूर तालुका भटके-विमुक्त जाती-जमाती सेलच्या वतीने शरदचंद्रजी पवार  यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त माऊली आश्रमामध्ये मुलांना  फळे व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रसह इंदापूर तालुक्यात आज विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा अभिष्टचिंतन दिन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लाडक्या नेत्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना कार्यकर्ते दिसत आहेत. 
यामध्ये शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भटक्या विमुक्त जाती जमाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्रंटलर सेलचे प्रदेशाध्यक्ष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे कार्य चालू असताना इंदापूर तालुक्यात भटक्या-विमुक्त जाती जमाती सेल तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी इंदापूर तालुक्यात संघटन करून भटक्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांसह प्रयत्न करीत आहेत. अशा या इंदापूर तालुका भटके-विमुक्त जाती जमाती सेलच्या वतीने आज (दि.१२ डिसेंबर) रोजी इंदापूर येथे माऊली आश्रम शाळा इंदापूर या ठिकाणी आश्रमातील मुलांना फळे व खाऊ वाटप देऊन अनोख्या पद्धतीने आपल्या  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना अभिष्टचिंतनाचा शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन दिन उत्साहात साजरा केला.
यावेळी अण्णासाहेब धोत्रे अध्यक्ष, संतोष शिंदे  उपाध्यक्ष, सुरेश दरदरे उपाध्यक्ष, नितीन शिंदे उपाध्यक्ष, सोमनाथ पवार संघटक, महेश काळे सरचिटणीस, आत्माराम जाधव उपाध्यक्ष, धनाजी जाधव. इत्यादी भटक्या विमुक्त जाती जमाती इंदापूर तालुका  सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
close