इंदापूर येथे प्रसिद्ध हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या उरूसाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली भेट.
दर्गा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तो निधी देणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान, इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्ण पान आणि एकूणच इंदापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक अशा हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या ४५७ व्या उरूसाला कालपासून (११ डिसेंबर, मार्गशीर्ष ८) सुरुवात झाली. भारतीय पंचांगातील मार्गशीर्ष या नवव्या महिन्यात साजरा केला जाणारा हा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही शासनाच्या नियमांनुसार आणि अत्यंत साध्यापणाने मात्र पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे.
या उरुसाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन चादर चढविली व दर्गा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तो निधी देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले.
तसेच दर्शन घेतल्यानंतर लहान मुलांकरिता खेळणी खरेदी करून वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत ,अनिकेत वाघ, सागर पवार, राहुल गुंडेकर,फकीर पठाण, हमीद आतार व इतर भाविक उपस्थित होते.

