shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहाजी नगर येथील दत्त देवस्थानमुळे प्रसन्न वातावरण झाले आहे - मयूरसिंह पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विना पूजा संपन्न

शहाजी नगर येथील दत्त देवस्थानमुळे प्रसन्न वातावरण झाले आहे - मयूरसिंह पाटील

 राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विना पूजा संपन्न
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे दत्त जन्मा निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची विना पूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवर.

इंदापूर(प्रतिनिधी):मानवी जीवनात मनाला आनंद फक्त परिणामातून अखंड घेता येतो.यासाठी आयोजित केलेले हरिनाम सप्ताह,ग्रामीण व शहरी भागासाठी वरदान ठरत असल्याचे,शहाजी नगर येथील दत्त देवस्थान मुळे हजारो भक्तगणांची या परिसरात वर्दळ वाढून धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.गौरवोद्गार इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी काढले.


        इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर रेडा येथे श्री दत्त देवस्थान यांच्यावतीने,दत्त जन्म उत्सवानिमित्त

रविवार(ता.12 रोजी)गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताहाच्या पारायणाचे चे विना विना पूजन, टाळ-मृदंग पुजा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील बोलत होते.दत्त देवस्थान चे प्रमुख तानाजी गायकवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष निलकंठ मोहिते,नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर,इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किरणशेठ बोरा, संचालक सचिन देवकर,रेडा गावचे सरपंच नानासाहेब देवकर,ज्येष्ठ नेते किसनराव देवकर,ह.भ.प. तुकाराम महाराज काळकुटे, ह-भ-प प्रदीप महाराज पवार,सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे,नरेंद्र भोसले, सतीश राऊत,श्याम इनामे,यांच्यासह अगोती भजनी मंडळ,सर्जेननाथ भजनी मंडळ वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


         पुढे बोलताना माजी सभापती पाटील म्हणाले की, शहाजीनगर रेडा गावासारखा ग्रामीण भागात दत्त देवस्थान च्या माध्यमातून तब्बल अठरा वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यात येते. यामधून किर्तन भजन अन्नदान असे उपक्रम राबवण्यावर दत्त देवस्थान चा भर असतो.त्यामुळे हजारो भक्तगणांची वर्दळ या परिसरात होत आहे.अन्नदाना सारखे महान कार्य या देवस्थानच्या माध्यमातून होत असल्याने,हजारो लोकांचे ऋणानुबंध जोडले जातात.अशी ही माहिती माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी दिली.


         इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक सचिन देवकर व सौ अंबिका सचिन देवकर या उभयतांच्या हस्ते महाभिषेक पार पडला.गुरुचरित्र पूजन व मानाची आरती बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत देवस्थानच्या वतीने नीलकंठ मोहिते, रेडा गावचे माजी उपसरपंच बायडाबाई बाबर,सोमनाथ मोहिते,सतीश साठे,औदुंबर खंडागळे यांनी केले.तर आभार सागर शिंदे यांनी मानले.


.



close