shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पदयात्रींचे शिर्डीत जंगी स्वागत..!

शिर्डी । प्रतिनिधी :
काल नाशिक येथील श्रमिक मित्रमंडळ तसेच P.N. Group यांच्या वतीने आयोजित नाशिक शिर्डी पदयात्रेचे स्वागत साई निर्माण ग्रूपचे अध्यक्ष श्री विजूभाऊ कोते पाटील यांच्या वतीने आमच्या साई निर्माण निवास या ठिकाणी करण्यात आले.. या वेळी साई पालखीतील सर्व पदयात्रेतील साईभक्तांचा सत्कार साई द्वारकामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ताराचंद कोते यांच्या वतीने करण्यात आला, सर्व पदयात्रेकरूंना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

  या पदयात्रेतील संयोजक श्री प्रविण नवले, श्री सागर पगारे, श्री निलेश रेळेकर, श्री रामभाऊ बैरागी, श्री ताऊ, श्री दिपक पगारे, श्री सोनूभैय्या, श्री स्वप्निल दरावडे, श्री मयुर नवले यांनी नाशिक येथे उपनगर या ठिकाणी श्री साईबाबांचे सुंदर असे साई मंदिर बांधले असून साईबाबांच्या सुंदर अशा मुर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २४, २५ व २६ तारखेला करण्यात येणार आहे अशी माहिती वरिल सर्व साईभक्तांनी दिली.
close