शिंगवे:- शिंगवे नाईकचे माजी सरपंच विश्वासराव जाधव यांच्या दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अ.नगरचे विद्यमान उपाध्यक्ष तथा देहरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सरजी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहिदास कर्डिले तसेच साहेब पंचायत समिती सदस्य व्ही, डी,काळे शिवसेनेचे नगर तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत आणि महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत शिंगवे नाईक विद्यमान सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळपकर, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके, शिंगवे शिवसेना शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव, तसेच युवा सेना शाखा अध्यक्ष किरण शेळके,तसेच नगर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व दुकानदार यांनी देखील जाधव(तात्या) यांना शुभेच्छा दिल्या.!
यावेळी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

