shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार लंके म्हणाले,धडपड्या कार्यकर्त्यांची समाजाला खरी गरज..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१    
आमदार लंके म्हणाले,धडपड्या कार्यकर्त्यांची समाजाला खरी गरज..!!
राजू रोकडेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा 

पारनेर :आजच्या समाजाला समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या तरुणांची आवश्यकता आहे.त्यामुळे सामाजिक भावनेतून कार्य करून तरुणांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा जरूर प्रयत्न करावा त्यामुळे गावागावात समाजाप्रती खरी कळकळ असणारा राजू रोकडे सारख्या धडपड्या कार्यकर्त्यांची खरी गरज असल्याचे गौरवोद्गार आमदार निलेश लंके यांनी खडकवाडी येथे बोलताना केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना जातीचे दाखले उपलब्ध करून देणे तसेच आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड देणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजू रोकडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध विधायक उपक्रमांनी साजरा होतो याबद्दल आमदार निलेश लंके यांनी विशेष उल्लेख केला आणि डी.जे. व पार्ट्या ही आपली संस्कृती नसून समाज सेवा हेच आपले ब्रीद आहे असेही आमदार निलेश लंके यावेळी म्हणाले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close