शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१
संगमनेर : महाविद्यालयीन विद्यार्थीनीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. तिला सिगारेटचे चटके देऊन नको ते तिचे फोटो काढल्याची घटना घडली.आहे.
संगमनेरमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना पुढे आली आहे. चार जणांनी ती महाविद्यालयात जात असताना तिला रस्त्यात अडवून कार मध्ये बळजबरीने बसवून अपहरण केले.
तिला सिन्नर इथे एका लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार प्रवीण अरुण लगड याने तिच्यावर अत्याचार केला असून त्यानेच अश्लील फोटो काढून तिला सिगारेटचे चटके दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी नऊ ते दोन डिसेंबर 2021 दरम्यान घडली आहे. पीडित तरुणीवर अत्याचार तर केले वर नाशिकला नेऊन तिच्या घरच्यांना आरोपींनी धमकावले. तसेच मुलीकडून बळजबरीने खोटा जबाब सिन्नर पोलिस ठाण्यात घेण्यात आला. तसेच पुन्हा पीडितेवर सिन्नर मधील एका लॉजवर अत्याचार आरोपी प्रवीण लगडने केले.
मुलगी घरी आल्यानंतर तिने सविस्तर प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी आरोपी प्रविण अरुण लगड, संकेत भगवान राणे, दर्शन शिवाजी हिरे, राहुल कौलास वाघमारे (रा. संगमनेर व सिन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

