प्रतिनिधी । सुनिल ज्ञानदेव भोसले :
जगाच्या नकाशावर पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरातील मिस्ती अग्रवाल या तेरा वर्ष रणरागिनी ने हिमालयातील केदार कांता या बारा हजार पाचशे फूट उंचीच्या पर्वतावर यशस्वी चढाई करत लोणावळा शहराचा नावलौकिक द्विगुणीत केला आहे आहे अतिशय थंड तापमानात 18 ते 21 डिसेंबर हे चार दिवस ही मोहीम सुरू होती माष्टी हिचे मामा अशितोष अग्रवाल व आई आशा अग्रवाल यांच्या प्रेरणेने व पाठींब्यामुळे तिने ही यशस्वी चढाई केली.
वेस्टन्ड इव्हेंट अँड एडवेंचर लोणावळा या संस्थेच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेत सहभागी झालेली व्यक्ती ही सर्वात लहान ट्रेकर्स होती या चार दिवसीय ट्रेक ची सुरुवात सांकरी बेस्ट येथून झाली यामध्ये प्रत्येक सहा ते आठ तासात एक उंच टेकडी पार करावी
दिवसभरात सरासरी पंधरा किमी अंतर पार करत चार दिवसात हा 12,500 फुटाचा ट्रॅक पूर्ण करण्यात आला अतिशय थंड हवामान गार वारा अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिस्त्री ने ही मोहीम फत्ते केली मी तिला तिचे मामा अशितोष अग्रवाल यांनी सायकलिंग व ट्रेकिंग चे प्रशिक्षण दिले आहे बारा वर्षाची असताना तिने लोणावळा पुणे लोणावळा लोणावळा सहारा लोणावळा अशी सायकल इन केली आहे ट्रेक च्या कालावधी मध्ये मिस तिची परीक्षा होती मात्र या रायवुड इंटरनॅशनल स्कूल या तिच्या शाळेच्या प्राचार्यांनी सुट्टी व पाठबळ दिल्याने ट्रेक करणे शक्य झाले
या ट्रेक विषयी बोलताना मिस्टी म्हणाली ट्रेकसाठी वय लिंग वेळ यापेक्षा मानसिक तयारी फार महत्त्वाची आहे मनात प्रबळ इच्छा असल्यावर काहीही अशक्य नाही हिमालयातील बर्फातून चालताना व प्रचंड थंडीत देखील हा ट्रेक पूर्ण करायचा हा मनाशी केलेला संकल्प केदारकांतच्या शिखरावर पोहोचल्यावर पूर्ण झाला.

