*'श्री बाबीर देवाला रासप कडून दुग्धाभिषेक,*
*'रूई बाबीरनगरी-'राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री, आमदार महादेवजी जानकर साहेब यांना नुकतीच काही दिवसापूर्वी करोणाची लागण झाली कोरोनातून जानकरसाहेब लवकर बरे व्हावेत, यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष शाखा रुई बाबीरनगरी,व राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने आज 'महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री बाबीर देवाला दह्या-दुधाने दुग्धाभिषेक करण्यात आला आणि बाबीर देवाला साकडे घालण्यात आले की देवा वंचित, शोषित, उपेक्षित, घटकांना सत्तेची वाट दाखवणाऱ्या लोकनेत्याला, यातून लवकर बरे कर अशी प्रार्थना बाबीर देवाला करण्यात आली,*
*यावेळी 'राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, पुणे जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड, जिल्हा खजिनदार तानाजी शिंगाडे, तालुकाध्यक्ष सतिश तरंगे, विधानसभा उपाध्यक्ष अविनाश मोहिते, रूई शाखा कार्याध्यक्ष अमोल भुजबळ, शाखा उपाध्यक्ष तानाजी मोहिते,अभय मारकड, संभाजी मोहिते,आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,*

