shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडीतील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाचा निधी कसा पोहोचेल यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तत्पर - मधुकर भरणे.

झगडेवाडीतील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाचा निधी कसा पोहोचेल यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तत्पर -  मधुकर भरणे.

झगडेवाडीत ५१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भुमिपुजन.
इंदापूर प्रतिनिधी:झगडेवाडी तील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाचा निधी कसा पोहोचेल यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तत्पर आहेत त्यामुळे झगडेवाडी च्या ग्रामस्थांना विकास कामा संदर्भात काळजी नसावी असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथील झगडेवाडी ते अभंग वस्ती रस्ता करणे ३० लक्ष रुपये झगडेवाडी अंतर्गत डेनेज लाईट तयार करणे २१ लाख रुपये अशा  ५१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भुमिपुजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच रुपाली अतुल झगडे, श्रीकांत मोरे, जालिंदर कोराटे,संतोष राजगुरू, डॉ सुनील झगडे, बाळासाहेब झगडे, सतीश अभंग ,पांडुरंग अभंग ,भाऊ बारवकर, भानुदास झगडे,सचिन अभंग,विजय झगडे,सुरेश झगडे, लक्ष्मण झगडे, राजेंद्र बनकर, नामदेव झगडे,प्रल्हाद झगडे, अशोक अभंग,महादेव झगडे बबन बनकर, सचिन बारवकर ग्रामसेवक धायगुडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मधुकर भरणे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी चे सरकार असून या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे मंत्री असल्याने तालुक्यामध्ये भरपूर विकासाचे कामे होत आहेत.त्यांच्या सूक्ष्म  नियोजन पद्धतीने काम सुरू असल्याने आपण सर्वजण निश्चिंत राहा.आज झगडेवाडी गावाचा विकासात्मक कायापालट होत आहे तो बघण्यासारखा असल्याचे यावेळी मधुकर भरणे यांनी म्हटले.

 येणाऱ्या काळामध्ये झगडेवाडी गाव हे विकासाचे मॉडेल ठरेल या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली केली आहे. सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत सिमेंट रस्ते सुसज्ज ग्रामसचिवालय,प्राथमिक शाळा,व्यायाम शाळा, अभंग वाडी हायमास्ट दिवे इत्यादी सर्व कामे अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावली असल्याचे मत यावेळी भरणे यांनी व्यक्त करून विद्यमान सरपंच रूपाली झगडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा कामाचे कौतुक केले.

यावेळी बोलताना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल दगडे म्हणाले की झगडेवाडी गावच्या विकासात खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. गेले वीस वर्षात गाव विकासापासून वंचित होते.कुठल्याही प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. आश्वासनाच्या जोरावर राजकारण केले जायचं.परंतु आज खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाला न्याय मिळाला तो केवळ खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळाला असल्याचा दावाही यावेळी यांनी केला.

यावेळी अतुल झगडे म्हणाले की, माझ्या गावात वयस्कर ज्येष्ठ नागरिक गावातील तरुण विकास कामाबद्दल समाधानी आहेत. भविष्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गावातील विकासकामे सुरू राहतील.

या वेळी दादाराम झगडे यांनी आभार मानले.
close