प्रतिनिधी : आसावरी वायकर
भेंडा : २ / मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक विद्यालय भेंडा येथील 1990/92 ला 10/12 वी ला शिक्षण घेतलेले सर्व माजी विद्यार्थी आज स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भेंडा तालुका नेवासा येथे एकत्र आले .
भेंडा येथील स्थानिक विद्यार्थी माजी सरपंच गणेश गव्हाणे यांनी पुढाकार घेऊन सर्वांना आपली संकल्पना सांगितली त्यानुसार दत्तू गवळी अशोक नवथर अशोक फटांगडे ऍड भरत वर्मा बाबासाहेब सतरकर प्रा. राशीनकर संभाजी अर्जुन शिंदे यांनी 31 वर्षानंतर एकत्र जमण्याचं संकल्प केला .
गणेश गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते असल्याने सर्वांशी ते संपर्कात होतेच 4 दिवसात नियोजन करून कार्यक्रम ठरवला .नौकरी व्यवसाय निमित्त पुणे औरंगाबाद नगर आदी ठिकाणी आलेले सर्व जुने मित्र 30 वर्षानंतर एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते .सकाळी विद्यालयात भेट देऊन स्वागत गार्डन भेंडा येथे कार्यक्रम सुरू झाला, प्रथम हयात नसलेले शिक्षक वर्गमित्र यांना आदरांजली वाहिली . सर्वानी आपल्या भावना व्यक्त केल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला,विद्यालय विषयी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी योगदान देण्याचे ठरवले, आपल्या तील काही मित्र खरोखरच अडचणीत आले तर तत्पर मदतीला धावून येण्याचे एकमेकांना सांगितले . तसेच यथेच्छ स्नेह भोजनाचा आनंद घेऊन पूर्ण दिवसभर थांबुन एकमेकांचा निरोप घेतला.
या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख डॉ शिवाजी शिंदे पुणे येथील D Y पाटील कॉलेज चे प्राचार्य डॉ .अरविंद पाटील, H D F C बँकेच्या पुणे विभागाचे रिजनल मॅनेजर संजय कोलते बाप्पू सोनवणे विजय साळुंखे संतोषसाळुंखे संजय पोटे , प्रा दीपक पाटील भारत फोर्ज चे अधिकारी गंगा लोंढे देविदास कचरे पैठण येथील कृषी अधिकारी डेंगळे साहेब सुनील चौधरी औरंगाबाद येथील कंपनी कृषी चे प्रा बाप्पू फुंडे गणेश आरगडे विकास काळे प्राचार्य राम नेव्हल डॉ मिसाळ प्रगतिशील शेतकरी ढोकने रामेश्वर राजेंद्र क्षीरसागर व्यावसायिक दत्तात्रय चोपडे सुनील दगडे रामभाऊ गवळी जॉनी सोनकांबळे सुशील पायगुडे संजू तनपुरे सह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते .

