(मिलींद प्रधान यांची निवडणुक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी)
हिंगोली/प्रतीनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात शासकीय पदाचा गैरवापर करुन सेनगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाच्या उमेदवाराचा सोशल मिडीयावर पोष्ट टाकुन प्रचार केल्याने आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी सेनगाव महावितरणचे कार्यकारी अभियंता सत्यनारायन वडगावकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन तात्काळ निलंबीत करण्यात यावे या मागणीचे निवेदन इंडीयन ह्युमन राईटस आँर्गनायझेशन च्या वतीने दि.३० डिसेंबर गुरुवार रोजी निवडणुक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,सन २०२१ सेनगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने प्रचार शिगेला पोहोचला असतांना वार्ड क्र.११ चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गजानन विठ्ठलराव घोगरे हा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मुलगा असल्याने सेनगावचे कार्यकारी अभियंता सत्यनारायण वडगांवकर यांनी भाजपाचे उमेदवार गजानन विठ्ठलराव घोगरे यांच्या समर्थनात दि.१५ डिसेंबर रोजी सोशल मिडीयाच्या फेसबुक वर पोष्ट करत प्रचार करुन शासकीय पदाचा गैरवापर करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे.
यावरुन असे दिसून येते की,भाजपाचे आमदार यांनी शासकीय कर्मचारी यांना पक्षाच्या प्रचाराच्या कामाला लावले आहे.वार्ड क्र.११ मधील भाजपाचे उमेदवारांचा प्रचार करुन सुध्दा सदरील उमेदवाराची निवडणुन येण्याचे संकेत दिसत नसल्यामुळे अभियंता वडगांवकर यांनी सुडबुध्दीने उच्च अधिकारी आनुन त्या वार्डामध्ये सर्वसामान्य जनतेवर चुकीच्या कार्यवाह्या करण्याचा सपाटा लावला आहे यावरुन असे शिध्द होते की,वडगांवकर हे हेतु पुरस्पर व सुडबुध्दीने सर्वसामान्य जनतेवर चुकीच्या कार्यवाह्या करीत आहेत.तरी साहेबांना निवेदनाव्दारे विनंती की,संबधीत वडगांवकर यांच्यावर शासकीय पदाचा गैरवापर करुन भाजपा पक्षाच्या उमेदवाराचा सोशल मिडीयावर पोष्ट टाकुन प्रचार केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करुन तात्काळ निलंबीत करावे अन्यथा भारतीय मानव अधिकार संघटन हिंगोली जिल्ह्याच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.या निवेदनावर हिंगोली जिल्हाध्यक्ष मिलींद प्रधान यांची स्वाक्षरी आहे.

